फक्त मुद्द्याचं!

22nd April 2026
पिंपरी-चिंचवड

पिंपरी चिंचवड महापालिका आयोजित प्लॉगाथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद!

पिंपरी चिंचवड महापालिका आयोजित प्लॉगाथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद!

शहर स्वच्छतेचा संदेश कृतीतून साकार
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका फ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने प्रभाग क्रमांक ११ कोयनानगर येथे आयोजित करण्यात आलेला प्लॉगाथॉन उपक्रम उत्साहात पार पडला. शहर स्वच्छतेचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देणाऱ्या या उपक्रमाला नागरिकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला.

viara vcc
viara vcc

महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल, किरणकुमार मोरे यांच्या अधिपत्याखाली राबवण्यात आलेल्या या उपक्रमात उपायुक्त संदीप खोत, क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील, सहा. आरोग्य अधिकारी महेश आढाव, मुख्य आरोग्य निरीक्षक कांचनकुमार इंदलकर, आरोग्य निरीक्षक गौरव दराडे, महेंद्र साबळे, समाधान कातड, रामचंद्र शिंगाडे यांच्यासह सुमारे २५० ते ३०० नागरिक, विविध सामाजिक संस्था आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत परिसरातील कचरा गोळा केला. स्वच्छता हीच खरी जबाबदारी हा संदेश नागरिकांनी आपल्या कृतीतूनच दाखवून दिला.

या उपक्रमामध्ये विविध शैक्षणिक संस्था, सामाजिक संघटना, फिटनेस गट तसेच स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. त्यामध्ये गणगे प्रशाला विद्यालय, राजर्षी शाहू विद्यालय, गणेश इंटरनॅशनल स्कूल, एक्सपायर अकॅडमी, ओमसाई फिटनेस क्लब, सुप्रभात ज्येष्ठ नागरिक संघ, आदर्श क्रांती सामाजिक संस्था, विद्याव्हेली कॉलेज, सिद्धेश्वर ज्येष्ठ नागरिक संघ, दामोदर हरीश चाफेकर औद्योगिक प्रशिक्षण कॉलेज, माऊली संगीत विद्यालय, डी. वाय. पाटील कॉलेज, भगवती बचत गट, जॉगर्स पार्क ग्रुप इत्यादींचा समावेश होतो.

या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता वाढण्यास मोठी मदत झाली असून, पिंपरी चिंचवड शहर पुन्हा एकदा स्वच्छतेच्या स्पर्धेत अव्वल स्थान मिळवण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे उपआयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी यावेळी सांगितले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"