स्पार्क अकॅडमी आणि परंडवाल क्रिकेट अकॅडमी विजयी!

पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशन आयोजित “टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा”
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनच्या वतीने फोर स्टार क्रिकेट मैदान हिंजवडी फेज-3 येथे चालू असलेल्या “पिंपरी चिंचवड “पिंपरी चिंचवड क्रिकेट करंडक” मर्यादित २० षटकांच्या खुल्या गटाच्या आंतर क्रिकेट क्लब सामन्याचे निकाल खालील प्रमाणे आहेत. स्पार्क अकॅडमी आणि परंडवाल क्रिकेट अकॅडमी विजयी.

स्पार्क अकॅडमी चार गडी राखून विजयी
स्पार्क अकॅडमी चार गडी राखून विजयी स्पार्क अकॅडमी विरुद्ध क्रीकफिटनेट अकॅडमी यांच्यात झालेल्या सामन्यांमध्ये स्पार्क अकॅडमी चार गडी राखून विजयी झाली. प्रचित भळगट या सामन्याचा सामनावीर ठरला.
क्रीकफिटनेट अकॅडमी १६३ धावा ८ बाद २० षटके:- आदित्य एकशिंगे ५४, तिलक जाधव २७, अथर्व भोसले ४७, सार्थक चौधरी २३/२, अद्वैत कृष्णा २८/२, प्रचित भळगट १९/२
स्पार्क अकॅडमी १६५ धावा ६ बाद १९.५ षटके:- निशांत शेवाळे ६२, करण यु ३९, प्रचित भळकट ३०, औक्षण जाधव ३३/२ प्रसन्न पवार ३५/२. प्रचित भळगट या सामन्याचा सामनावीर ठरला.
परंडवाल क्रिकेट अकॅडमी ३९ धावांनी विजयी
परंडवाल क्रिकेट अकॅडमी विरुद्ध आर टी फाइटर्स ११ यांच्यात झालेल्या सामन्यांमध्ये परंडवाल क्रिकेट अकॅडमी ३९ धावांनी विजयी झाली. प्रीतम सूर्यवंशी या सामन्याचा सामनावीर ठरला
परंडवाल क्रिकेट अकॅडमी १५६ धावा ९ बाद २० षटके:- प्रसन्न मोरे २७, नवयुग बास्केट ३२, शुभम शेलार १६, प्रीतम सूर्यवंशी ४०, अक्षय डावखरे १९/६
आर टी फाइटर्स ११ ,११७ धावा ८ बाद २० षटके:- साईश शिंदे १६, विवेक टिपरे ५१, कृष्णा चौधरी ३०, कुंदन कुमार २१/३, प्रीतम सूर्यवंशी १५/२, हिरा चौधरी २४/२. प्रीतम सूर्यवंशी या सामन्याचा सामनावीर ठरला

