फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
पिंपरी-चिंचवड

फटाका स्टॉलसाठी परवानगी घ्या अन्यथा..

फटाका स्टॉलसाठी परवानगी घ्या अन्यथा..

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड शहरात वेगवेगळ्या ठिकाणी फटाका स्टॉल उभारण्यासाठी आतापर्यंत ६० व्यावसायिकांनी परवानगी घेतली आहे. विनापरवाना स्टॉल उभा केल्यास त्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा अग्निशामक विभागाने दिला आहे. महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयांमधून आतापर्यंत व्यावसायिकांनी परवानगी घेण्यास प्रारंभ केल आहे.

महापालिकेचा अग्निशामक विभाग आणि आठही क्षेत्रीय कार्यालयांकडून फटाका स्टॉलसाठी परवानगी देण्यात येत आहे. विनापरवाना फटाके स्टॉलवर कारवाईचा इशारा अग्निशामक विभागाने दिला आहे. परवानगी घेऊनच स्टॉल उभारण्याचे आवाहन महापालिकेने केले.

अवघ्या काही दिवसांवर दिवाळी येऊन ठेपलेली असताना शहरात ठिकठिकाणी फटाक्यांचे स्टॉल उभारले जात आहेत. विक्रेत्यांची लगबग सुरू आहे. शहरात दर वर्षी अनेक स्टॉल परवानगी न घेताच उभारले जातात. परंतु, यंदा महापालिका कठोर धोरण अवलंबिणार आहे. फटाका स्टॉलसाठी महापालिकेच्या अग्निशामक विभाग आणि आठही क्षेत्रीय कार्यालयांकडून दोन हजार रुपये शुल्क आकारून परवानगी देण्यात येत आहे. अग्निशामक विभागाकडून बांधकाम आणि शटर असलेल्या गाळ्यांमध्ये स्टॉल उभारण्यासाठी ना हरकत दाखला दिला जातो. तसेच, मोकळ्या जागेवर परवानगी दिली जात नसल्याचेही अग्निशामक विभागाकडून सांगण्यात आले. व्यावसायिकांनी परवानगी घेऊनच स्टॉल उभारावा अन्यथा कारवाई केली जाईल, असे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे उपायुक्त मनोज लोणकर यांनी सांगितले.

शहर परिसरातून फटाका स्टॉल उभारण्यासाठी ६० जणांनी अर्ज केले होते. त्यांना अग्निशामक विभागाने परवानगी दिली आहे. बेकायदा फटाका स्टॉल उभारल्यास क्षेत्रीय कार्यालयाच्या अतिक्रमण विभागातर्फे कारवाई करण्यात येणार आहे. आगीच्या घटना टाळण्यासाठी स्टॉलशेजारी वाळू ठेवावी. फटाका स्टॉल परिसरात बिडी, सिगारेट पेटवू नये, ज्वलनशील पदार्थ ठेवू नये, स्टॉलपासून लहान मुलांना दूर ठेवावे. पाण्याची व्यवस्था ठेवावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"