एसजेएसएफ प्रीमियर लीग २०२६ चे भोसरीत आयोजन!

पिंपरी : पिंपरी-चिंचवड परिसरात युवा क्रिकेटपटूंना संधी देणाऱ्या एसजेएसएफ प्रीमियर लीग २०२६ या भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती एसजेएसएफ चे सुशील जाधव यांनी दिली आहे. या स्पर्धेत एकूण चार संघांचा सहभाग असून त्यामध्ये सिंहगड एसजेएसएफ, शिवनेरी एसजेएसएफ, रायगड एसजेएसएफ आणि प्रतापगड एसजेएसएफ या संघांचा समावेश आहे.

स्पर्धेचे सामने २७, २९ व ३० जानेवारी २०२६ रोजी खेळवले जाणार असून, अंतिम सामना २ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी Powered Athletes High Performance Centre हे शीर्षक प्रायोजक म्हणून सहकार्य करत आहे.
स्पर्धेचे सर्व सामने वाळके स्पोर्ट्स ग्राउंड, भोसरी येथे होणार असून, या स्पर्धेमुळे स्थानिक क्रिकेटला नवे व्यासपीठ मिळणार आहे. युवा खेळाडूंसाठी अनुभव व आत्मविश्वास वाढवणारी ही स्पर्धा क्रिकेटप्रेमींमध्ये विशेष आकर्षण ठरत आहे.

