Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

12th September 2026
गुन्हेगारी

ज्येष्ठ नागरिकाची ऑनलाइन 6 लाख 70 हजारांची फसवणूक!

ज्येष्ठ नागरिकाची ऑनलाइन 6 लाख 70 हजारांची फसवणूक!

पिंपरी : ज्येष्ठ नागरिकाचा विश्वास संपादन करून ई एम आय डेट चेंज करण्यासाठी एपीके फाईल डाऊनलोड करण्यास सांगून त्यांची 6 लाख 70 हजार रुपयांची रक्कम ऑनलाईन पध्दतीने काढून घेऊन फसवणूक केली. ही घटना 9 ऑगस्ट 2026 रोजी ऑनलाइन पद्धतीने करण्यात आली.

viara vcc
viara vcc

याप्रकरणी अन्वर शफिक सय्यद (वय 61, रा. सर्वे नंबर 29 /3 भीमाशंकर कॉलनी, लेन नंबर दोन, रामकृष्ण मंगल कार्यालयाजवळ पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. एक मोबाईल धारक (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) आणि रक्कम स्वीकारणारे बँक अकाउंटधारक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी बँक अकाउंट धारक फिर्यादीचा विश्वास संपादन करून फिर्यादीच्या ईएमआयएसइओ डेट चेंज करण्यासाठी एपीके फाईल डाऊनलोड करण्यासाठी सांगून अप्रमाणिकपणे स्वतःच्या आर्थिक फायद्या करता आरोपीने फिर्यादीच्या बँक अकाउंट मधून ऑनलाईन पद्धतीने 6 लाख 70 हजार काढून घेऊन फसवणूक केली. सांगली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक म्हैसाळे व पोलीस निरीक्षक कोळी हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"