1 लाख रुपये किंमतीचा गांजा बाळगल्याने हॉटेल चालकास अटक!

पिंपरी : अमली पदार्थ गांजा 1 लाख रुपये किंमतीचा बेकायदेशीरपणे विक्रीकरिता जवळ बाळगल्याने एका व्यक्तीस अटक करण्यात आली आहे. ही कारवाई सोमवार 10 ऑगस्ट रोजी पाच वाजण्याच्या सुमारास भुगाव येथील अमन होंडा समोर ,पद्मावती हॉटेल, ता. मुळशी) येथे करण्यात आली.
याप्रकरणी अरुण पांडुरंग नरळे पोलीस हवालदार बावधन पोलीस ठाणे यांनी फिर्याद दिली आहे. रुपेश गोपाळ शेट्टी (वय 38 ,रा. शेडगे वाडा, भुगाव ता. मुळशी), कृष्णा साखरे (रा. भुंडे वस्ती, बावधन) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून रुपेश शेट्टी यास अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी रुपेश गोपाळ शेट्टी यांचा हॉटेल व्यवसाय असून आरोपीने 1 लाख रुपये किंमतीचा 1992 ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ गांजा बेकायदेशीरपणे विक्रीकरिता जवळ बाळगला. हा गांजा विक्रीकरिता कृष्णा साखरे यांच्याकडून आणला होता असा कबुली जबाब शेट्टी यांनी दिला आहे. बावधन पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षका शितल गिरी या तपास करत आहेत.

हिरो होंडा स्प्लेंडर अज्ञात चोरट्याने नेली चोरुन!
पिंपरी : चिखली कुदळवाडी येथील आपणा वजनकाट्याजवळ रोडच्या कडेला लॉक करून पार्क केलेली हिरो कंपनीची स्प्लेंडर टू व्हीलर अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही घटना सोमवार नऊ ऑगस्ट रोजी दुपारी दोन ते पाच वाजण्याच्या सुमारास कुदळवाडी चिखली आपणा वजन काट्या जवळ घडली.
याप्रकरणी कासिम आली नुसरत आली रहमानी (वय 30, रा. सी ओ बालघरे यांचे रूम मध्ये बालघरे नगर ,कुदळवाडी, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांनी त्यांची हिरो कंपनीची काळ्या रंगाची 20 हजार रुपये किंमतीची स्प्लेंडर टू व्हीलर गाडी नंबर( एम एच 14 के एच 17 29) कुदळवाडी चिखली येथील आपणा वजन काट्याजवळ रोडच्या कडेला लॉक व पार्क करून ठेवली असता अज्ञात चोरट्याने चोरून नेली. चिखली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शेळीमकर आणि काटकर हे तपास करत आहेत. हिरो होंडा स्प्लेंडर अज्ञात चोरट्याने चोरली

