Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

14th September 2026
गुन्हेगारी

स्वयंघोषित भाईची रुपीनगर भाजी मंडई परिसरात दहशत!

स्वयंघोषित भाईची रुपीनगर भाजी मंडई परिसरात दहशत!

पिंपरी :ओळख का देत नाही असे म्हणत स्वयंघोषित भाईने साथीदारासह एका तरुणाला लोखंडी रॉड आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच परिसरात दहशत निर्माण केली. ही घटना शुक्रवार 21 ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास रुपीनगर भाजी मंडईतील रॉयल मेन्स वेअर दुकानासमोर घडली.

याप्रकरणी अनिकेत सचिन वाकळे (वय 19, रा.निगडी) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मनमित सिंग (रा.यमुनानगर, निगडी) आणि त्यांच्या तीन साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाकळे हे कपडे आणण्यासाठी गेले असता आरोपीने ओळख का देत नाही असे म्हणत त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर तीन साथीदारांना बोलवून फिर्यादी यांना दुकानाबाहेर आणले. लोखंडी रॉड हवेत फिरवत मी या भागातील भाई आहे. मध्ये आल्यास कोणाला सोडणार नाही अशी धमकी दिली. आरोपींनी फिर्यादीच्या डोक्यात हातावर आणि पाठीवर मारहाण करून गंभीर जखमी केले. तसेच जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी पसार झाले. चिखली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक देवकर तपास करत आहेत.

viara vcc
viara vcc

बेकायदा पिस्तूल बाळगले ; तरुणास अटक!
पिंपरी : बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला खंडणी विरोधी पथकाने अटक केली. ही कारवाई रविवार 23 ऑगस्ट रोजी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास आदर्श नगर, शिवनेरी कॉलनी, किवळे येथे करण्यात आली.

आदित्य कैलास कदम (वय 20, रा. रावेत) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई देहूरोड पोलीस ठाणे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस आयुक्तांच्या मनाई आदेशाचा भंग करून आरोपी कदम याने कोणत्याही परवान्याशिवाय 50 हजार रुपये किंमतीचे लोखंडी पिस्तूल जवळ बाळगले. खंडणी विरोधी पथकाला याबाबत माहिती मिळाल्यानंतर कारवाई करून त्याला ताब्यात घेण्यात आले. आरोपीकडून पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस हवलदार देवकर तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"