फक्त मुद्द्याचं!

22nd May 2026
पिंपरी-चिंचवड

कंत्राटी पद्धतीने नगरसचिव म्हणून निवृत्त अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप रुजू!

कंत्राटी पद्धतीने नगरसचिव म्हणून निवृत्त अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप रुजू!

राजकारणाचे बळी ठरलेले नगरसचिव कोळप यांची “ग” क्षेत्रीय अधिकारी म्हणून बदली
पिंपरी पिंपरी चिंचवड महापालिकेचे निवृत्त अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांची कंत्राटी पद्धतीने नगरसचिव म्हणून नेमणूक करण्यात आली असूल बुधवार 20 मे रोजी ते महापालिकेत रुजू झाले आहेत राजकारणाचे बळी ठरलेले सध्याचे नगरसचिव मुकेश कोळप यांची “ग” क्षेत्रीय अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.

viara vcc
viara vcc

राजकारणी मंडळी आपल्या सोयीनुसार निर्णय घेतात आणि त्याचा फटका अधिकाऱ्यांना बसतो. असाच प्रकार महापालिकेचे लेखा वित्त अधिकारी प्रवीण जैन यांच्या बाबतीतही झाला आहे. त्यांच्यावर दबाव टाकून 60 कोटी 18 लाखाची ठेकेदारांची बिले उपसचनांद्वारे वाटप करण्यात आली. मात्र ही बिले कोणी देण्यासाठी प्रयत्न केले याची चौकशी मात्र झाली नाही. असाच प्रकार कोळप यांच्या बाबत झाला आहे .सत्ताधाऱ्यांची मर्जी असेल तर काम न करणारा अधिकारी देखील चालतो. परंतु यासाठी मर्जी ठेवावी लागते.

नगरसचिव पदावर मुकेश कोळप हे नवीन आहेत त्यांना अजून अनुभव नाही याची जाण सत्ताधाऱ्यांना देखील आहे. या पदावर काम करताना जर प्रतिनियुक्तीवरील अधिकारी असता तर त्याची बदली केली असती का? नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत निवृत्त अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांची नगर सचिव म्हणून नियुक्ती करण्यास मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार ते रुजू झाले आहेत . महापालिकेचे निवृत्त अतिरिक्त आयुक्त तथा नगर सचिव उल्हास जगताप कंत्राटी नगरसचिव म्हणून रुजू झाले आहेत. ते एक वर्षासाठी नगरसचिव म्हणून कामकाज पाहणार आहेत.

त्यांना शासनाचे कोणतेही लाभ मिळणार नाहीत. प्रशासकीय व वित्तीय अधिकार प्रदान करण्यात येणार नाहीत .त्यांच्याकडून तसे हमीपत्र महापालिकेने घेतले आहे. 10 जून 2025 च्या राज्य शासन तरतुदीनुसार वेतन व भत्ते अदा करण्यात येतील याव्यतिरिक्त अन्य कोणतेही लाभ व इतर सेवा लाभ देण्यात येणार नाहीत .या अटीवर उल्हास जगताप यांची कंत्राटी पद्धतीने नगरसचिव म्हणून नियुक्ती करण्यास आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी अंतिम मान्यता दिली आहे.

कंत्राटी पद्धतीवर नगरसचिव म्हणून उल्हास जगताप रुजू झाल्याने सध्याचे नगरसचिव असलेले मुकेश कोळप यांची महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी” ग” क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी म्हणून तातडीने बदली केली आहे. त्यांच्याकडे नगरसचिव विभागाचे कामकाज कायम ठेवण्यात आले आहे .या निर्णयामुळे महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये उलट सुलट चर्चा सुरू आहे .

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"