दिघीत गजानन महाराज ट्रस्टचे धार्मिक कार्यक्रम

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : दिघी येथील श्री संत गजानन महाराज सेवाभावी सार्वजनिक ट्रस्टच्या वतीने भजन, कीर्तन, हरिपाठ, गणेशयाग व पारायण आदी धार्मिक कार्यक्रम नुकतेच घेण्यात आले.
श्री संत गजानन विजय ग्रंथ पारायणाचे व्यासपीठ प्रमुख ह.भ.प. प्रकाश रामकृष्ण डिक्कर हे होते. दररोज सकाळी श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण, दुपारी १२ ते २ यावेळेत विविध महिला भजनी मंडळाची भजने, सायंकाळी हरिपाठ व सायंकाळी ६.३० ते ८.३० या वेळेत हरिकीर्तन झाले. ह.भ.प. किशोर महाराज कुळकर्णी (दिघी), ह.भ.प. रामचंद्र महाराज इंगोले (अकोला), ह.भ.प. चांडुरंग महाराज लाजुरकर -(आळंदी), ह.भ.प राहुल महाराज बोडखे (आळंदी) व ह.भ.प. ‘नारायण महाराज खंदारे (आळंदी) यांचे कीर्तन सेवा झाले.
श्रीं च्या ११४ व्या पुण्यतिथी निमित्त सकाळी वेदशास्यसंपन्न चंद्रकांत पाठक गुरुजी यांचे मंत्रोच्चारात गणेश याग’ पार पडला. दुपारी १२ वाजता श्री संत गजानन महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त पुष्पवर्षाव व “गण गण गणात बोते” हा गजर करण्यात आला. अभिषेक व त्यानंतर आरती केली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजनी मंडळाचे जागराचे भजन, सोमवारी सकाळी ८ वाजता श्रींच्या मंदिरापासून संत गजानन महाराजनगर परिसरातून श्रींच्या पालखीची दिंडीसह मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर ह.भ.प. आदिनाथ महाराज जुन्नरकर (खडकी) यांचे सकाळी १० ते १२ या वेळेत पुण्यतिथी महोत्सवानिमित्त काल्याचे कीर्तन झाले. त्यानंतर महाप्रसाद वाटप करून महोत्सवाची सांगता झाली, अशी माहिती ट्रस्टचे सचिव कैलासराव नप्ते यांनी दिली.