फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
पिंपरी-चिंचवड

वाहनांचा ई-लिलाव २६ डिसेंबरला

वाहनांचा ई-लिलाव २६ डिसेंबरला

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवडमधील मोटार वाहन कर न भरलेल्या आणि मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्यांतर्गत जप्त केलेल्या १० वाहनांचा ई-लिलाव जाहीर करण्यात येणार आहे. येत्या २६ डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी चिंचवड येथे हा लिलाव होणार आहे.

वाहन कर भरण्याची संधी ई-लिलावाच्या तारखेपर्यंतउपलब्ध आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी दिली आहे. लिलावाच्या अटी आणि नियम ९ डिसेंबरपासून कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी-चिंचवड येथील नोटीस बोर्डावर सकाळी १० ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत उपलब्ध राहील. १६ ते १९ डिसेंबर या कालावधीत http://www.eauction.gov.in/ या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने नाव नोंदणी करावी लागेल. वाहने जशी आहेत तशी या तत्त्वावर जाहीर ई-लिलावाद्वारे विक्री होणार आहे.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"