फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
पिंपरी-चिंचवड

कलाटेंच्या प्रचारार्थ डॉ. कोल्हेंची रविवारी बाईक रॅली

कलाटेंच्या प्रचारार्थ डॉ. कोल्हेंची रविवारी बाईक रॅली

चिंचवड : विधानसभेतील महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रचारार्थ संसदरत्न, खासदार डॉ. अमोल कोल्हे रविवारी (ता. १०) भव्य सांगवी-नवी सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर या भागातून बाईक रॅली काढणार आहेत. या रॅलीत चिंचवड विधानसभेतील महाविकास आघाडीचे हजारो कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.

सकाळी दहा वाजता नवी सांगवीतील साई चौकापासून ह्या बाईक रॅलीचा शुभारंभ होणार आहे. त्यांनंतर पाण्याची टाकी, बँक ऑफ महाराष्ट्र, शितोळे चौक गणपती मंदिर, बाळासाहेब शितोळे मार्केट, मेन रस्ता मंदिर शिवाजी चेंबर्स, पवार नगर चौक गार्डन, अभिनव नगर, गजानन महाराज मुळा नगर, एकता आयप्पा मंदिर, पवना नगर, ममता नगर, सेवा हॉस्पिटल, जुनी सांगवी बस स्टॉप, ढोरे भवन माकन हॉस्पिटल समोरुन माहेश्वरी चौक, साई चौक, फेमस चौक, क्रांती चौक, कृष्ण चौक, काटेपुरम चौक, रामकृष्ण मंगल कार्यालय चौक, पूजा हॉस्पिटल, शिवाजी चौक पी.सी.एम.सी बस स्टॉप श्रुष्टी चौक – डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, महालक्ष्मी कार्यालय, जवळकर नगर, काशीद पार्क, स्वराज गार्डन चौक, काटे पेट्रोल पंप, काटे वस्ती, शिवार चौक, कोकणे चौक, पी.के चौक, महादेव मंदिर यामार्गे ही रॅली निघणार असून रहाटणीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सांगता होईल.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"