फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
पिंपरी-चिंचवड

राहुल कलाटे यांनी सहकुटुंबिय बजावला मतदानाचा हक्क

राहुल कलाटे यांनी सहकुटुंबिय बजावला मतदानाचा हक्क

वाकड : चिंचवड विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार कलाटे राहुल तानाजी यांनी घरात देवदर्शन केले. प्रथम नगरसेवक दिवंगत नेते तानाजीभाऊ कलाटे यांच्या प्रतिमेचे दर्शन तसेच आई माजी नगरसेविका कमल कलाटे यांचे आशीर्वाद घेऊन आज सकाळी ८ वाजता कमल प्रतिष्ठान संचलित माउंट लिटेरा स्कुल, वाकड या मतदान केंद्रावर सहकुटुंब मतदानाचा हक्क बजाविला.

माध्यमांशी संवाद साधताना राहुल कलाटे म्हणाले, या निवडणुकीत जनतेने मला खूप मनापासून साथ दिली. खूप प्रेम दिले. या निवडणुकीला सामोरे जात असताना आम्ही सकारात्मक प्रचारावर भर देत, विकासकामांचे मुद्दे जनतेसमोर मांडले. भविष्यातील ५ वर्षांत या मतदारसंघाच्या विकासासाठी व लोकांच्या प्रगतीसाठी काय करता येईल, याबद्दलचे व्हिजन मी मतदारांसमोर मांडले. औद्योगिक नगरी पिंपरी-चिंचवड शहाराचे जनक शरदचंद्रजी पवार साहेब तसेचं दूरदृष्टी नेतृत्व हिंदू हृदय सम्राट उद्धव ठाकरे, राहुल गांधी, अरविंद केजरीवाल यांचे विकासाचे व्हिजन घेऊन लोकांसमोर गेलो. त्यामुळे मला खात्री आहे, की यावेळी मतदारराजा मला आपल्या सेवेची संधी देणार आहे. मी मतदारसंघातील सर्व बंधू-भगिनींना आवाहन करतो, की जास्तीत जास्त मतदान करुन लोकशाही बळकट करण्यासाठी सर्वांनी योगदान द्या.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"