फक्त मुद्द्याचं!

16th June 2025
पिंपरी-चिंचवड पुणे

पुणे आणि पिंपरीत काल मुसळधार पाऊस

पुणे आणि पिंपरीत काल मुसळधार पाऊस

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराला रविवारी पुन्हा एकदा मुसळधार पावसाने झोडपले. शहराच्या अनेक भागांमध्ये घरांमध्ये पाणी शिरले. सोसायट्यांमध्येही पाणी साचले.

सोमवारच्या राखी पौर्णिमेनिमित्त खरेदीसाठी बाजारपेठेत बाहेर पडलेल्या पुणेकरांची आणि पिंपरी चिंचवडकरांची काल संध्याकाळी चांगलीच तारांबळ उडाली. अचानक आलेल्या मुसळधार पावसाने नागरिकांची धावपळ झाली. शनिवारी रात्रभर पाऊस पडला. सकाळपासून शहरात पावसाचे कोणतेही चिन्ह नव्हते. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची त्रेधा उडाली. आठवडाभर विश्रांती घेतलेला पाऊस अचानक सुरु झाला आणि मुसळधार कोसळला. रस्त्यावरही पाणी साचले आणि वाहतूक कोंडीचा देखील सामना करावा लागला. विविध ठिकाणी पाणी साचले.

गेला आठवडाभर वातावरणातील उष्णता वाढली होती. काल दिवसभर नागरिक उकाड्याने हैराण झाले. सायंकाळी अचानक अंधारून आल्यानंतर मुसळधार पाऊस पडला. अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. थेरगाव मधील सुंदर कॉलनी आणि परिसरात सायंकाळी सव्वा सहा वाजताच्या सुमारास पाणी भरले. अग्निशमन विभागाच्या जवानांनी सोसायटीची सीमा भिंत फोडून साचलेल्या पाण्याला मार्ग करून दिला.

पिंपरीमधील वायसीएम चौकात देखील पाणी साचले. घरात पाणी शिरल्यामुळे संसार उपयोगी साहित्य पाण्यात बुडाले. चिंचवडमध्ये अनेक रस्त्यांवर पाणी साचले. या पाण्यामुळे वाहन चालकांना अडचणींचा सामना करावा लागला. पुणे स्टेशन परिसरात झालेल्या पावसामुळे तळे साचले होते.

तर संपूर्ण पूर्व पुण्यात मुसळधार पाऊस झाला असून हडपसर, मगरपट्टा, कोंढवा, पाषाण, कात्रज, पेठ भागात, शिवाजीनगर, कोथरूड, स्वारगेट, डेक्कन, बिबवेवाडी, शनी नगर, उंड्री, कल्याणी नगर,, सिंहगड रोड, धायरी येथे पावसाचा जोर वाढला आहे. तर पिंपरी चिंचवड येथे देखील मुसळधार पाऊस झाला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज आणि उद्या (२० ऑगस्ट) रोजी पुण्यात ढगांच्या गडगडाटासह दुपारनंतर पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"