फक्त मुद्द्याचं!

6th May 2026
पुणे

हवेली, भोरमध्ये अनधिकृत होर्डिंगवर ‘पीएमआरडीए’चा हातोडा!

हवेली, भोरमध्ये अनधिकृत होर्डिंगवर ‘पीएमआरडीए’चा हातोडा!

दोन दिवसांच्या मोहिमेत दोन महाकाय होर्डिंग जमीनदोस्त; अनधिकृत होर्डिंगधारकांचे धाबे दणाणले
पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील अनधिकृत होर्डिंगविरोधात प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेतला असून, गेल्या दोन दिवसांत हवेली आणि भोर तालुक्यात जोरदार कारवाई करण्यात आली. या विशेष मोहिमेत दोन महाकाय होर्डिंग जमीनदोस्त करण्यात आले असून, आगामी काळातही हे ‘कारवाईसत्र’ सुरूच राहणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

viara vcc
viara vcc

अनधिकृत बांधकामे आणि होर्डिंगमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याच्या पार्श्वभूमीवर ‘पीएमआरडीए’च्या अनधिकृत बांधकाम निर्मूलन पथकाने महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्या आदेशावरून व अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम हाती घेतली आहे. मंगळवारी हवेली तालुक्यातील खेड शिवापूर (पश्चिम) येथे पथकाने धडक कारवाई केली. येथील गट क्रमांक २७२ मध्ये ‘ईश्वरी ॲड्स’ या संस्थेने अनधिकृतपणे उभारलेले होर्डिंग हटवण्यात आले.

यापूर्वी सोमवारी भोर तालुक्यातील कामथडी येथे मोठी कारवाई करण्यात आली. येथील गट क्रमांक ७५१ मधील ‘बी. के. नाईक अँड सन्स’ यांच्या मालकीचे अजस्र होर्डिंग प्रशासनाने काढले. दोन दिवसांच्या या मोहिमेत होर्डिंगचे लोखंडी सांगाडे आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे.

महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्या आदेशानुसार व अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली असून, अनधिकृत बांधकाम विभागाचे प्रभारी सहआयुक्त हिंमत खराडे यांच्या नेतृत्वात तहसीलदार आशा होळकर, तहसीलदार रवींद्र रांजणे, सहनगर नियोजनकार श्री. सावकारे यांच्या पथकाने ही कामगिरी फत्ते केली. प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय उभारण्यात आलेल्या अन्य होर्डिंगवरही येत्या काळात तीव्र कारवाई केली जाईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"