फक्त मुद्द्याचं!

6th May 2026
गुन्हेगारी

अग्निशस्त्रे शोध मोहिम; नऊ देशी कट्टे, पाच मॅक्झिन, 46 जिवंत काडतुसे जप्त!

अग्निशस्त्रे शोध मोहिम; नऊ देशी कट्टे, पाच मॅक्झिन, 46 जिवंत काडतुसे जप्त!

चार गुन्हेगारांना अटक; गुन्हे शाखा युनिट एक पथकाची कारवाई
पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी अवैध अग्निशस्त्र कारवाई मोहीम राबवण्यात येत असून या मोहिमेअंतर्गत पिंपरी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत झालेल्या गुन्ह्याबाबत खबऱ्यामार्फत माहिती मिळाली. त्यानुसार कारवाई करून चार गुन्हेगारांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली. त्यात आरोपीकडून एकूण नऊ देशी कट्टे, पाच मॅगझिन, 46 जिवंत काडतुस, दोन वाहने असा आठ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल व अवैध अग्निशस्त्रे साठा जप्त करण्यात आला आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त गुन्हे डॉक्टर शिवाजी पवार यांनी दिली.

viara vcc
viara vcc

देहूरोड परिसरात व्यापाऱ्यावर झालेल्या गोळीबार हत्या प्रकरण व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय परिसरात वाढत्या गुन्हेगारीस आळा घालण्याकरिता केलेल्या कारवाई अंतर्गत चार गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत ही अग्निशस्त्रे जप्त करण्यात आली. बेकायदेशीर अग्निशस्त्र शोध मोहीम राबवत असताना पोलीस उपनिरीक्षक शिवानंद स्वामी यांना खबर्यामार्फत ठोस माहिती मिळाली. त्यानुसार अझरुद्दीन रफिक सुतार (वय 30, डिलिव्हरी बॉय, रा. महाराष्ट्र कॉलनी, थेरगाव), वैभव अशोक शेटे (वय 31, सोशल मीडिया वर मॅनेजमेंट, रा. महाराष्ट्र कॉलनी, थेरगाव), सौरव धनंजय जाधव (वय 27, रा पाषाण), अक्षय अशोक कांबळे (वय 31, रा. पाषाण, पुणे) या आरोपींना अटक करून गुन्ह्याच्या तपासा दरम्यान पोलीस कोठडीमध्ये त्यांच्याकडून एकूण नऊ देशी कट्टे, पाच मॅक्झिन, 46 जिवंत काडतुसे दोन वाहने असा आठ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल अवैध अग्निशस्त्र साठा जप्त करण्यात आला. याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळीग करीत आहेत.

गुन्हे शाखा युनिट एकचे प्रभारी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळीग, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक शिवानंद स्वामी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष इंगळे, प्रमोद वेताळ, पोलीस हवालदार जयवंत राऊत, महादेव जावळे, अजय डगळे ,देवा राऊत, शिवराम भोपे, विजय शेळकंदे यांच्यासह पथकाने कारवाई केली.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"