फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
पिंपरी-चिंचवड

२३ जानेवारी रोजी पिंपरी चिंचवडकरांना अनुभवता येणार पुणे ग्रँड टूरचा थरार!

२३ जानेवारी रोजी पिंपरी चिंचवडकरांना अनुभवता येणार पुणे ग्रँड टूरचा थरार!

बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६
पिंपरी : बजाज पुणे ग्रँड टूरचा महत्त्वाचा टप्पा शुक्रवार, २३ जानेवारी रोजी पिंपरी-चिंचवड शहरातून जाणार असून पुन्हा पुणे ग्रँड टूरचा थरार अनुभवता येणार आहे.

viara vcc
viara vcc

या टप्प्याची सुरुवात दुपारी १.३० वाजता श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, म्हाळुंगे-बालेवाडी येथून होणार आहे. बालेवाडी स्टेडियममधून निघाल्यानंतर ही स्पर्धा पुण्यातील अनेक टप्पे पार करत राजीव गांधी पूल (औंध), काळेवाडी फाटा, बास्केट ब्रिज (रावेत), डी. वाय. पाटील कॉलेज (आकुर्डी), भक्ती-शक्ती चौक, त्रिवेणीनगर चौक, दुर्गानगर चौक, इंद्रायणी नगर चौक, संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल, भोसरी डिस्ट्रिक्ट सेंटर सर्कल, स्पाईन रोड, जुना आरटीओ रस्ता, आयुक्त बंगला व एम्पायर इस्टेट ब्रिज मार्गे पुन्हा काळेवाडी फाटा आणि राजीव गांधी पूल (औंध) येथून पुण्याकडे जाणार आहे. या टप्प्याचा समारोप दुपारी ४ वाजता जंगली महाराज रोड येथील बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार असून, या दिवशी देखील पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातील नागरिकांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकल स्पर्धेचा थरार अनुभवण्याची संधी मिळणार आहे.

मार्गावरील शाळा दुपारी बारा वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे जिल्हाधिकार्यांचे आदेश
23 जानेवारी रोजी स्टेज 4 ची स्पर्धा छत्रपती शिवाजी स्टेडियम बालेवाडी येथून सुरू होऊन ती पुणे शहर हद्दीत जाऊन परत औंध राजीव गांधी ब्रिज मार्गे पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत येणार आहे. सांगवी, वाकड, निगडी, त्रिवेणी नगर, भोसरी, चिखली, पिंपरी, काळेवाडी, परिसरातून फिरून परत राजीव गांधी ब्रिज मार्गे पुणे शहर हद्दीत जाणार आहे ही स्पर्धा सुरळीत व सुरक्षितपणे पार पाडण्याकरिता व नागरिकांची गैरसोय टाळण्याकरिता स्पर्धा मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आलेली आहे.

सदर वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आलेली आहे असे वाहतूक पोलिसांनी कळवले आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय टाळण्याकरता स्पर्धा मार्गावरील सांगवी, वाकड, रावेत, ताथवडे, पुनावळे, निगडी, प्राधिकरण, इंद्रायणी नगर, चिंचवड एमआयडीसी, चिखली, काळेवाडी, भोसरी एमआयडीसी, यशवंतनगर, पिंपरी, त्रिवेणीनगर या परिसरातील शाळा या दुपारी बारा वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र हुडी यांनी पिंपरी चिंचवड महापालिका शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक व शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद पुणे यांना दिले आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"