फक्त मुद्द्याचं!

30th June 2025
पिंपरी-चिंचवड

पिंपरी चिंचवड महापालिकेचा मालमत्ता कर वसुलीसाठी करदात्यांना इशारा !

पिंपरी चिंचवड महापालिकेचा मालमत्ता कर वसुलीसाठी करदात्यांना इशारा !

३० जून पर्यंतच्या विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी आता शेवटची संधी
पिंपरी : मालमत्ताधारकांनी कारवाई टाळण्यासाठी 30 जुन पर्यंत मालमत्ता कर भरावा अन्यथा पिंपरी चिंचवड महापालिका १ जुलै पासून मालमत्ता कर वसुलीची मोहीम अधिक व्यापक स्वरुपात राबवविणार आसल्याचा इशारा दिला आहे. वारंवार आवाहन करून तसेच जप्तीची नोटीस देऊन देखील कर न भरणाऱ्या थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई करण्याची मोहीम महापालिकेकडून हाती घेतली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी चालू आर्थिक वर्षातील तसेच थकीत कर तात्काळ भरावा, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाच्या वतीने मालमत्ता धारकांसाठी ३० जून २०२५ पर्यंत संपूर्ण कराचा भरणा ऑनलाइन स्वरूपात केल्यास १० टक्के सवलत देण्यात येत आहे. याशिवाय महापालिकेने ३० जून २०२५ पर्यंत विविध कर सवलती जाहीर केल्या आहेत. या सवलतींचा लाभ घेण्यासाठी अवघा एक दिवस शिल्लक आहेत. ही योजना संपल्यानंतर मात्र १ जुलैपासून महापालिकेच्या वतीने कर वसुलीसाठी व्यापक मोहीम हाती घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

viarasmall
viarasmall

अद्यापही ज्या थकबाकीदारांनी मालमत्ता कर भरलेला नाही, त्यांना जप्तीपूर्व नोटीस बजावण्यात येणार असून यापूर्वी ज्यांना अशी नोटीस दिली आहे, त्यांच्यावर केव्हाही जप्तीची कारवाई केली जाऊ शकते. यामध्ये निवासी मालमत्ता धारकांचे वाहन, टीव्ही, फ्रिजसारख्या वस्तू जप्त करण्यात येणार आहे, अशी माहिती कर संकलन आणि कर आकारणी विभागातून देण्यात आली. तरी नागरिकांनी आपला चालू आर्थिक वर्षातील तसेच थकीत कर भरून या सवलतींचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

कारवाई टाळण्यासाठी कर भरा
ज्या मालमत्ताधारकांनी धनादेशाद्वारे कराचा भरणा केला, परंतू त्यांचे धनादेश वटले नाहीत, अशा मालमत्तांधारकांना लवकरच जप्ती अधिपत्र पाठवून त्यांच्यावर जप्तीची कारवाई केली जाणार आहे. ही जप्तीची कारवाई टाळण्यासाठी सदर मालमत्ताधारकांनी ३० जूनपूर्वी आपला मालमत्ता कर ऑनलाईन किंवा रोख स्वरूपात भरावा, असे कर संकलन आणि कर आकारणी विभागातून सांगण्यात आले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"