फक्त मुद्द्याचं!

14th May 2026
गुन्हेगारी

सोनसाखळी चोर पोलिसांच्या जाळ्यात;हिंजवडी गुन्हे शोध पथकाचे यश!

सोनसाखळी चोर पोलिसांच्या जाळ्यात;हिंजवडी गुन्हे शोध पथकाचे यश!

पिंपरी : मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावणाऱ्या एका तरुणाला अटक केली आहे. हिंजवडी पोलिसांनी ही कारवाई केली. ओमकार राजेश बनसोडे (वय 23, मांजरी, पुणे) असे अटक आरोपीचे नाव आहे .त्याचा साथीदार विशाल विलास काळे (रा. मांजरी, पुणे) हा फरार आहे.

vcc gudhi padva
vcc gudhi padva

पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार 7 मार्च रोजी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी महिला चालत असताना मोटरसायकल वरून आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण जबरदस्तीने हिसकावले. यावेळी महिलेला ढकलून देत जखमीही केले. हिंजवडीच्या गुन्हे शोध पथकाने घटना स्थळ परिसरातील शंभर होऊन अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा माग काढला. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे ओमकार बनसोडे याला मांजरी परिसरातून ताब्यात घेण्यात आले. आरोपीकडून चोरीस गेलेले सोन्याचे गंठण जप्त करण्यात आले.

ही कामगिरी हिंजवडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, ऋषिकेश धाडगे, सहाय्यक निरीक्षक दुर्गानाच माळी, सोमनाथ पांचाळ ,उपनिरीक्षक अशोक दुधावणे, अंमलदार नरेश बलसाने, चिंतामणी जोशी, कैलास केंगले ,विजय गेंगजे, संदीप मसाळ, कबीर पिंजारी, कारभारी पालवे, ओमप्रकाश कांबळे, विशाल भोईर, अरुण पारधी, अजित शिंदे ,मंगेश लोखंडे यांच्या पथकाने केली.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"