फक्त मुद्द्याचं!

23rd March 2026
पिंपरी-चिंचवड

पिंपरी चिंचवड महापालिकेचा ७०२ कोटींचा मालमत्ता कर वसूल!

पिंपरी चिंचवड महापालिकेचा ७०२ कोटींचा मालमत्ता कर वसूल!

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत १ एप्रिल २०२५ पासून ते २ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत ७०२ कोटी ७३ लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल केला आहे. तसेच पुढील दोन महिन्यांत मालमत्ता कर वसुलीच्या दृष्टीने व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे. तरी ज्या मालमत्ताधारकांनी अद्याप मालमत्ता कर भरलेला नाही, त्यांनी तो लवकरात लवकर भरावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

viara vcc
viara vcc

महापालिकेच्या कर संकलन विभागाने यावर्षी कर वसुलीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला आहे. ऑनलाईन पेमेंट प्रणाली तसेच विविध डिजिटल माध्यमांद्वारे नागरिकांना कर भरण्यासाठी सुलभ सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यासोबतच, कर भरण्याबाबत एसएमएस, नोटीस व प्रत्यक्ष भेटीद्वारे नियमित पाठपुरावा करण्यात आल्याने वसुलीच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे.

वाकड विभागीय कार्यालयांतर्गत सर्वात जास्त वसुली
कर आकारणी व कर संकलन विभागाची १ एप्रिल २०२५ पासून ते २ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत वाकड विभागीय कार्यालयांतर्गत सर्वात जास्त वसुली झाली आहे. या कालावधीत या कार्यालयाने ८७ कोटी ४४ लाख रुपयांची वसुली केली आहे. तर चिंचवड विभागीय कार्यालयाने ४५ कोटी ४९ लाख, चिखली कार्यालयाने ५४ कोटी २७ लाख, कस्पटे वस्ती कार्यालयाने ४९ कोटी ९८ लाख, मनपा भवन ३४ कोटी २१ लाख, भोसरी ४४ कोटी ९१ लाख, सांगवी ३५ कोटी २६ लाख, मोशी ४३ कोटी ५२ लाख, पिंपरी वाघेरे ४२ कोटी २ लाख, किवळे ४७ कोटी ८७ लाख, थेरगाव ६९ कोटी ३ लाख, चऱ्होली २७ कोटी २१ लाख, निगडी प्राधिकरण १५ कोटी ६५ लाख, पिंपरी नगर ५ कोटी ७८ लाख, आकुर्डी ३२ कोटी ९४ लाख, दिघी-बोपखेल २१ कोटी ४० लाख, तळवडे १७ कोटी ६३ लाख, फुगेवाडी-दापोडी विभागीय कार्यालयाने २८ कोटी १० लाख रुपयांची वसुली केली आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"