शिक्षणासक्तांचे सदिच्छा दूत

- डॉ. तेजस्वी लक्ष्मण शिंदे ,अंतराळ शास्त्रज्ञ
महेशदादा लांडगे हे नाव केवळ राजकारण, कबड्डी, कुस्ती अशा मैदान गाजविणाऱ्या क्षेत्रांमध्येच प्रचलित आहे, असा लोकांमध्ये समज आहे. मात्र, त्यांच्या लेखी शिक्षण आणि संशोधन या क्षेत्राला आत्यंतिक महत्त्व आणि प्राधान्य आहे. या क्षेत्रासाठी देखील महेशदादांकडून दिले जाणारे योगदान तितकेच महत्त्वाचे आहे. शिक्षण क्षेत्रात नाव कमावू इच्छिणाऱ्या, शिक्षणासाठी धडपड करणाऱ्या तसेच शैक्षणिक मार्गात कोणत्याही अडचणी असतील तर त्यासाठी प्राधान्याने मदतीचा हात पुढे करणाऱ्यांपैकी अग्रक्रमाने घेतले जाणारे नाव म्हणजे आमदार महेशदादा लांडगे. भरपूर शिका, प्रगती करा, शहराचे आणि देशाचे नाव मोठे करा, असा विश्वास देत त्यांनी अनेकांना विद्याग्रहणाच्या मार्गावर सहाय्य केले आहे.

पिंपरी-चिंचवडकरांसाठी अभिमान असलेल्या हुशार, जिज्ञासू आणि अंतराळ शास्त्रज्ञ म्हणून आता नावारूपाला आलेल्या डॉ. तेजस्वी लक्ष्मण शिंदे यांच्या शब्दातून महेशदादांविषयी याच भावना व्यक्त झाल्या आहेत. डॉ. तेजस्वी लक्ष्मण शिंदे ह्या एक अंतराळ शास्त्रज्ञ आहेत. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत (इस्रो) त्यांनी काम केले आहे. त्यांच्या संशोधनाने उपग्रहांच्या विकासात आणि अंतराळ मोहिमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी विविध वैज्ञानिक प्रकल्पांवर काम केले आहे आणि त्यांचे कार्य भारतीय अंतराळ विषयक संशोधनाच्या प्रगतीत महत्त्वाचे ठरले आहे. त्यांच्या कार्यामुळे अनेक युवा वैज्ञानिकांमध्ये प्रेरणा निर्माण झाली आहे.
डॉ. तेजस्वी यांनी महेशदादांबद्दलची भावना व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या की, माझा आणि महेशदादांचा स्नेह फार जिव्हाळ्याचा आहे. नेहमी मदतीला धावून येणारी व्यक्ती म्हणूनच आम्ही त्यांच्याकडे पाहिले आहे. काही कारणाने ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी लागणारा व्हिसा मला मिळवायचा होता. त्यासाठी लागणारी कागदपत्रे पाठवायची होती. मात्र, आमच्यासमोर निर्माण झालेले प्रश्न सोडविण्यासाठी महेशदादांनी तत्परतेने मदत केली. त्या कठीण प्रसंगात त्यांनी पुढे केलेला मदतीचा हात मी आणि माझे कुटुंबीय कधीच विसरू शकणार नाही.
मदतीच्या पंखांचे बळ
महेशदादा यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान सगळ्यांनाच माहिती आहे. विविध सामाजिक उपक्रम, क्रीडा विषयक उपक्रम आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तरूणांच्या विकासासाठी त्यांनी आतापर्यंत खूप उपक्रम राबवविले आहेत. यातून अनेक तरूणांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी मिळाली आहे. अनेकांनी या संधीचे सोने केले. यापैकी प्रत्येक जण आज महेशदादांच्या नावाचा उल्लेख केल्याशिवाय पुढे जात नाही. महेशदादांच्या नेतृत्त्वामुळे अनेकांना प्रोत्साहन मिळाले आहे. विकास हा सर्वसमावेशक असावा हे त्यांनी आतापर्यंत कृतीतून दाखवून दिले आहे. आणि याचा अनुभव मी स्वतः घेतला आहे. मी एका सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेली आणि एका कामगार दाम्पत्याची लेक जेव्हा अंतराळाला गवसणी घालण्याचे स्वप्न पाहात होते, तेव्हा महेशदादा हीच व्यक्ती होती, ज्यांनी माझ्या स्वप्नांना मदतीच्या पंखांचे बळ दिले. मला आता यूएस एअर फोर्स डिफेन्स अनुदानद्वारे प्रायोजित कोलोरॅडो विद्यापीठात संशोधक पद मिळाले आहे. लवकरच मी अमेरिकेला पुढच्या शिक्षण आणि संशोधनाच्या कामासाठी रवाना होईन. पण माझ्या मायभूमीवर माझ्यावर विश्वास ठेवून मदतीला धावून येणाऱ्या दादांना कधीच विसरता येणार नाही. त्यांनी सहकार्याचा वाटा उचलल्यामुळे मी आज पुढे जाऊ शकले. आता या सहकार्याची जाणीव मला भविष्यात कायमच राहील.
भोसरी विधानसभा मतदासंघाचे आमदार महेश लांडगे यांचा डिजिटल कार्यअहवाल येथे वाचा
https://tinyurl.com/Shivnerica-Chava-MaheshDada
महेशदादांचे काम आणि व्यक्तिमत्व अतिशय प्रेरणादायी आहे. ते अनेकांना मदतीसाठी धावून येतात आणि समाजाच्या हितासाठी कार्यरत असतात. त्यांच्या विनम्र स्वभावामुळे आणि पुढाकारामुळे त्यांचे व्यक्तिमत्व वलयांकित भासते. महेशदादांसारखा नेता आज समाजात असणे ही खूप मोठी गरज आहे. त्यांच्या माध्यमातून मिळणारा राजाश्रय हा गरजू, बुद्धिमान, कष्टाळू विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. त्यांच्या नेतृत्त्वाला प्रगती, सकारात्मक बदल यांची किनार आहे. आजच्या पिढीचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी या नेतृत्त्वाची आवश्यकता आहे.