Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

11th September 2026
गुन्हेगारी

दारूसाठी पैसे न दिल्याने प्रवाशाला केली लोखंडी टॉमीने मारहाण!

दारूसाठी पैसे न दिल्याने प्रवाशाला केली लोखंडी टॉमीने मारहाण!

पिंपरी : रिक्षाचे भाडे न घेता रिक्षावाल्याने 200 रुपये दारू पिण्यासाठी मागितले. ते न दिल्याने रिक्षातील लोखंडी टॉमीने प्रवाशाला हकाला डोक्यात मारून जखमी केले.ही घटना शुक्रवार 21 ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास भुमकर चौक, मच्छी मार्केट वाकड येथे घडली .

याप्रकरणी आकाश लक्ष्मण चंदनशिवे (वय 30 ,रा.वाकडकर यांच्या भाड्याच्या खोलीत, विनोदी वस्ती, वाकड, मूळ पत्ता- मु, पो. शिराळा, ता. बार्शी, जि. सोलापूर) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हनुमंत बिराजदार (वय 32, रा. विनोदे वस्ती, वाकड), मंगेश गायकवाड (वय 30, पूर्ण नाव व पत्ता माहित नाही)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे डांगे चौकातून ड्रायव्हिंगचे काम करून आरोपी यांच्यासोबत रिक्षा मधून भुमकर चौक मच्छी मार्केट वाकड येथे आले असता रिक्षाचे भाडे वीस रुपये देत असताना ते न घेता रिक्षावाल्याने दोनशे रुपये दारू पिण्यासाठी मागितले. ते न दिल्याच्या कारणावरून आरोपी यांनी रिक्षातील लोखंडी टॉमी डोक्यात मारून फिर्यादीला जखमी केले. त्याचा मित्र याने हाताने मारहाण करून शिवीगाळ केली. हिंजवडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मोरे तपास करत आहेत .

viara vcc
viara vcc

यामाहा कंपनीची गाडी गेली चोरीला!
पिंपरी : यामाह कंपनीची पांढऱ्या रंगाची गाडी टाटा कंपनीच्या डिस्पॅच गेट समोरील पादचारी मार्गावर चिखली येथे पार करून ठेवली असता ती अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही घटना शुक्रवार 21 ऑगस्ट रोजी सकाळी आठ ते सायंकाळी सात या दरम्यान टाटा कंपनीचे डिस्पॅच गेट समोरील पादचारी मार्ग चिखली येथे घडली.

याप्रकरणी साई महिंद्र हेंद्रे (वय 22, रा. सी/ओ, धनंजय अंबिके यांच्या रूममध्ये भाड्याने, अष्टविनायक कॉलनी सद्गुरुनगर, भोसरी, मुळगाव- आखाडा, बाळापूर, ता. कळुमनूरी, जि. हिंगोली यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांची चाळीस हजार रुपये किंमतीची पांढऱ्या रंगाची यामाहा कंपनीची गाडी नंबर( एम एच 38 /ए एफ /97 91) टाटा कंपनीच्या डिस्पॅच गेट समोरील पादचारी मार्ग चिखली येथे पार्क केली होती. ती गाडी अज्ञात चोरट्याने चोरून दिली आहे. चिखली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक देवकर व पोलीस हवालदार सुतार तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"