फक्त मुद्द्याचं!

29th April 2026
पिंपरी-चिंचवड

महाराष्ट्र दिनानिमित्त ‘जाणता राजा’ या महानगरपालिकेकडून महानाट्याचे आयोजन!

महाराष्ट्र दिनानिमित्त ‘जाणता राजा’ या महानगरपालिकेकडून महानाट्याचे आयोजन!

पिंपरी : महाराष्ट्र दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांसाठी भव्य सांस्कृतिक मेजवानीचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र कीर्ती सोहळा प्रतिष्ठान आयोजित आणि पद्मभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित व दिग्दर्शित आशिया खंडातील पहिल्या क्रमांकाचे ऐतिहासिक महानाट्य ‘जाणता राजा’ सादर करण्यात येणार आहे.

viara vcc
viara vcc

निगडी, सेक्टर २५ येथील मदनलाल धिंग्रा मैदानात ‘जाणता राजा’ हे महानाट्य दि. १ मे २०२६ (शुक्रवार) रोजी सायंकाळी ६.३० वाजता आयोजित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, हे महानाट्य सर्वांसाठी विनामूल्य असून सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक नाट्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर रवि लांडगे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांची विशेष उपस्थिती असणार आहे. तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर रवि लांडगे असणार आहेत. याशिवाय विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, सुप्रिया सुळे, श्रीरंग आप्पा बारणे, डॉ. अमोल कोल्हे, महेश लांडगे यांची या कार्यक्रमास विशेष उपस्थिती लाभणार आहे.

यावेळी माहिती देताना महापौर रवि लांडगे म्हणाले की, महाराष्ट्र दिनी या महानाट्याच्या माध्यमातून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचा जाज्वल्य इतिहास ठेवण्याचा प्रयत्न आहे. त्यांचे शौर्य व कार्यापासून प्रेरणा घेवून या पिढीने कार्य करावे यासाठी या नाट्यप्रयोगाचे आयोजन केले आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"