फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
पिंपरी-चिंचवड

‘स्वच्छतेची पैठणी’चा मान मंगल जाधव यांना

‘स्वच्छतेची पैठणी’चा मान मंगल जाधव यांना

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी: स्वच्छता दूतांमुळे शहर स्वच्छ राहते. त्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य निरोगी व सुदृढ राहण्यास मदत होते. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महापालिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘स्वच्छतेची पैठणी’ या उपक्रमास भरघोस प्रतिसाद मिळाला. मंगल जाधव या पैठणीच्या मानकरी ठरल्या.

महापालिकेच्या वतीने ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवडा अंतर्गत ‘स्वभाव स्वच्छता-संस्कार स्वच्छता’ हे अभियान राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने सांगवी येथील नटसम्राट निळू फुले रंगमंदिर येथे महिला आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी ‘स्वच्छतेची पैठणी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, सहाय्यक आरोग्याधिकारी सुधीर वाघमारे, शांताराम माने, अंकुश झिटे, के. पी. एम. जी. संस्थेचे विनायक पद्मणे यांच्यासह महिला आरोग्य कर्मचारी उपस्थित होत्या.

महिलांसाठी मनोरंजक खेळ
स्वच्छतेची पैठणी या कार्यक्रमांतर्गत स्वच्छता कर्मचारी महिलांचे विविध खेळ घेऊन मनोरंजन केले. महिलांनीही उत्साहाने सहभाग घेऊन या कार्यक्रमाचा आनंद घेतला. मंगल जाधव यांनी प्रथम क्रमांक पटकावला. नेहा रंगवणे यांनी द्वितीय क्रमांक पटकावत सोन्याची नथ जिंकली तर सुशिला गायकवाड यांनी तृतीय क्रमांक मिळवून चांदीची जोडवी जिंकली.

सहाय्यक आयुक्त अजिंक्य येळे म्हणाले, ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवडा अंतर्गत महापालिकेच्या वतीने आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमाने शहरात स्वच्छतेचा संदेश नागरिकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहचवण्यास मदत होत असून पर्यावरणाचे संवर्धन करण्याबाबत जनजागृती देखील करण्यात येत आहे. तसेच सफाई कर्मचाऱ्यांचे आरोग्य तपासणी शिबिर, स्वच्छ सांस्कृतिक उत्सव आदी उपक्रमांचेही आयोजन करण्यात येत आहे.’ महापालिकेच्या वतीने ‘स्वच्छतेची पैठणी’ हा उमक्रम घेतला. त्यात मंगल जाधव या पैठणीच्या मानकरी ठरल्या. आर. जे. अक्षय यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"