फक्त मुद्द्याचं!

9th September 2025
पिंपरी-चिंचवड

नॉव्हेल इंटरनॅशनल शाळेचा दहावीचा निकाल १००% ; गुणवत्तेचा नवा टप्पा!

नॉव्हेल इंटरनॅशनल शाळेचा दहावीचा निकाल १००% ; गुणवत्तेचा नवा टप्पा!

पिंपरी : नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूलने यंदाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत १००% निकालाची उज्ज्वल कामगिरी करत शैक्षणिक गुणवत्तेचा नवा मानदंड प्रस्थापित केला आहे. यावर्षी शाळेचे एकूण १५२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते आणि सर्वांनी यशस्वी कामगिरी करत शाळेच्या यशाची पताका उंचावली.

novhel 3
novhel 3

शाळेतील टॉपर्समध्ये कु. पायल नरकेडे व कु.साकेत पाटणकर यांनी ९६.८% गुण मिळवत पहिला क्रमांक पटकावला. त्यांच्यानंतर कु. गौरी येळपळे – ९५.४%, कु. सुरभी चलाख – ९५%, कु. देवांशी कर्मकार – ९४.६% आणि कु. शर्वरी काकड – ९३.२% गुणांसह शाळेच्या गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळवले.

निकालाचा एकूण आढावा खालीलप्रमाणे
९०% पेक्षा अधिक गुण – १९ विद्यार्थी, ८०% पेक्षा अधिक – ४० विद्यार्थी,७०% पेक्षा अधिक – ४५ विद्यार्थी ,६०% पेक्षा अधिक – २८ विद्यार्थी ,५०% पेक्षा अधिक – १४ विद्यार्थी ,४०% पेक्षा अधिक – ६ विद्यार्थी

viarasmall
viarasmall

शाळेचे संस्थापक अध्यक्ष माननीय आमदार अमित गोरखे सर, प्रमुख विश्वस्त श्री विलास जेऊरकर सर, शाळा व्यवस्थापक डॉ प्रिया गोरखे, तांत्रिक विभाग प्रमुख श्री समीर जेऊरकर सर आणि मुख्याध्यापिका सौ. मृदुला गायकवाड यांनी सर्व विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे व पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूलने पुन्हा एकदा आपल्या शैक्षणिक गुणवत्ता, शिस्तबद्धता आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर दिलेल्या भराचे उत्तम उदाहरण समाजासमोर सादर केले आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"