फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
पिंपरी-चिंचवड

महानगरपालिका निवडणुकीसाठी एका उमेदवाराचा नामनिर्देशन अर्ज दाखल!

महानगरपालिका निवडणुकीसाठी एका उमेदवाराचा नामनिर्देशन अर्ज दाखल!

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या अनुषंगाने आज दिनांक २४ डिसेंबर २०२५ रोजी प्रभाग क्रमांक १७ (ड) साठी एका उमेदवाराने अर्ज दाखल केला आहे.

राज्य निवडणूक आयोगाने महापालिका सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून, त्यानुसार उमेदवारांना नामनिर्देशन अर्ज घेण्याची व अर्ज स्वीकृती प्रक्रिया २३ डिसेंबर २०२५ पासून सुरू झाली आहे. अर्ज वितरणाच्या पहिल्या दिवशी (२३ डिसेंबर) ८७५ इच्छुक उमेदवारांनी २ हजार २१२ अर्ज नेले होते.दुसर्या दिवशी इच्छुक उमेदवारांनी 1433 अर्ज नेले.असे एकूण 3645 अर्ज विक्री झाले. पहिल्या दिवशी एकाही उमेदवाराने निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला नाही.

तर आज (२४ डिसेंबर ) रोजी प्रभाग क्रमांक १७- ड साठी एक अर्ज दाखल केला असून गेल्या दोन दिवसात एकूण दाखल झालेल्या अर्जांची संख्या १ एवढी आहे.सचिन बाजीराव चिंचवडे (पक्ष – भारतीय जनता पक्ष) असे उमेदवाराचे नाव आहे.

अर्ज वितरण; क्षेत्रीय कार्यालय निहाय आकडेवारी
अ क्षेत्रीय कार्यालय –
प्रभाग क्र. १०, १४, १५, १९ साठी अनुक्रमे ६९ ४७, ५२ व ९२ असे एकूण २६० नामनिर्देशन अर्जांचे वितरण करण्यात आले.
ब क्षेत्रीय कार्यालय –
प्रभाग क्र. १६, १७, १८, २२ साठी अनुक्रमे ४७, ३३, २५ व ४७ असे एकूण १५२ नामनिर्देशन अर्जांचे वितरण करण्यात आले.
क क्षेत्रीय कार्यालय –
प्रभाग क्र. २, ६, ८, ९ साठी अनुक्रमे २६, २८, ३५ व ५० असे एकूण १३९ नामनिर्देशन अर्जांचे वितरण करण्यात आले.
ड क्षेत्रीय कार्यालय –
प्रभाग क्र. २५, २६, २८, २९ साठी अनुक्रमे ६९, ३७, १० व ३९ असे एकूण १५५ नामनिर्देशन अर्जांचे वितरण करण्यात आले.
इ क्षेत्रीय कार्यालय –
प्रभाग क्र. ३, ४, ५, ७ साठी अनुक्रमे ४३, २९, २२ व ३३ असे एकूण १२७ नामनिर्देशन अर्जांचे वितरण करण्यात आले.
फ क्षेत्रीय कार्यालय –
प्रभाग क्र. १, ११, १२, १३ साठी अनुक्रमे ३३, ८०, २० व ३२ असे एकूण १६५ नामनिर्देशन अर्जांचे वितरण करण्यात आले.
ग क्षेत्रीय कार्यालय –
प्रभाग क्र. २१, २३, २४, २७ साठी अनुक्रमे २८, ४३, १९ व ३२असे एकूण १२२ नामनिर्देशन अर्जांचे वितरण करण्यात आले.
ह क्षेत्रीय कार्यालय –
प्रभाग क्र. ३२, ३१, ३०, २० साठी अनुक्रमे ९२, ६८, ६८ व ८५ असे एकूण ३१३ नामनिर्देशन अर्जांचे वितरण करण्यात आले.

viara vcc
viara vcc
Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"