फक्त मुद्द्याचं!

16th June 2025
क्रीडा

नीरज चोप्राची `रौप्य` कामगिरी

नीरज चोप्राची `रौप्य` कामगिरी

पॅरिस : गुरुवारी रात्री बारा वाजल्यापासून जगभरातल्या क्रीडाप्रेमींचे लक्ष एकाच गोष्टीकडे होते. ते म्हणजे पॅरिस ऑलिम्पिकमधील भाला फेक. भारताकडे सुवर्णपदक आले नसले तरी रौप्यपदकावर आपले नाव कोरून नीरज चोप्रानं मोठा विक्रम केला आहे.

पाकिस्तानच्या अर्शद नदीमने गुरुवारी रात्री उशिरा पुरुषांच्या भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकून ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला. भारताच्या नीरज चोप्राने दुसरे स्थान मिळवत रौप्यपदक जिंकले. अशाप्रकारे नीरज चोप्रा ट्रॅक आणि फील्ड स्पर्धेत दोन पदके जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. गेल्या ऑलिम्पिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राने दुसऱ्या प्रयत्नात सर्वाधिक ८९.४५ मीटर भालाफेक केली, तर अर्शद नदीमने ९२.९७ मीटरसह ऑलिम्पिक विक्रम केला.

नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये ८७.५७ मीटर फेक करून सुवर्णपदक जिंकले होते, तर त्याची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी ८९.९४ मीटर आहे, जी त्याने २०२२ मध्ये स्टॉकहोम डायमंड लीगमध्ये रौप्य पदक जिंकून मिळवली होती. मात्र दोन मीटर अधिक फेक करूनही त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

अर्शदचा नीरज चोप्रावर विजय
यापूर्वी नीरज चोप्राने पात्रता फेरीत ८९.३४ मीटर भालाफेक करून प्रतिस्पर्ध्यांना जोरदार धक्का दिला होता. पाकिस्तानने आजपर्यंत ट्रॅक आणि फील्डमध्ये एकही ऑलिम्पिक पदक जिंकले नव्हते आणि आता थेट सुवर्णपदक जिंकले आहे. पहिल्याच प्रयत्नात फाऊल करणाऱ्या अर्शद नदीमने दुसऱ्या प्रयत्नात ९२.९७ असे अंतर पार केले त्यानंतरच खरेतर प्रत्येक खेळाडूवर त्या आकड्याचे दडपण आले. नीरज चोप्राही पहिल्या प्रयत्नात अपयशी ठरला आणि त्याचा दुसरा प्रयत्नही सर्वोच्च ठरला.

दोन पदके जिंकणारा चौथा भारतीय नीरज चोप्रा जरी सुवर्णपदक जिंकू शकला नसेल, पण असे असतानाही त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. दुसरे स्थान मिळवून, दोन वैयक्तिक ऑलिम्पिक पदके जिंकणारा तो स्वातंत्र्यानंतरचा केवळ चौथा भारतीय खेळाडू ठरला. स्वातंत्र्यानंतर, फक्त बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू (एक रौप्य आणि एक कांस्य), कुस्तीपटू सुशील कुमार (एक रौप्य आणि एक कांस्य) आणि नेमबाज मनू भाकर (दोन कांस्य) यांनी भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदके जिंकली आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"