दिवाकर स्मृती नाट्यछटेत तेजल महाजन प्रथम

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : नाट्यसंस्कार कला अकादमीतर्फे शालेय विद्यार्थी आणि मोठ्यांसाठी नाट्यछटा स्पर्धा घेण्यात आली. त्यात खुला गटात तेजल महाजन (प्रथम), दिपाली कुलकर्णी, दिपाली खिंवसरा यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविला आहे.
नाट्यसंस्कार कला अकादमीच्या स्पर्धेत प्राथमिक फेरी सिटी प्राईड शाळांच्या मोशी, रावेत, निगडी येथील शाळांमध्ये, चिंचवड येथील माटे हायस्कूल आणि ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी अशा पाच केंद्रांवर घेण्यात आली. प्राथमिक फेरीत पाचशेच्यावर स्पर्धकांचा सहभाग होता. त्यातून निवडल्या गेलेल्या सुमारे शंभर स्पर्धकांची अंतिम स्पर्धा ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी येथे घेण्यात आली. त्यानंतर स्पर्धेचा पारितोषिक वितरण सभारंभ मनोहर वाढोकर सभागृहात झाला. यावेळी आर्किटेक उदय कुलकर्णी, प्रज्ञानप्रबोधिनी शाळा मुख्याध्यापिका अपर्णा गोवंडे, प्रकाश पारखी, माधुरी ओक, अशोक अडावदकर उपस्थित होते. पारितोषिक वितरण समारंभापूर्वी सातही गटातील प्रथम क्रमांक विजेत्यांनी नाट्यछटा सादर केली.
नाट्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर म्हणाले, नाट्यकला ही केवळ अभिनयापुरती मर्यादित नसून विद्यार्थ्याचा सर्वांगिण विकास होण्यास मदत होत आहे. नाट्यसंस्कार कला अकादमी पिंपरी-चिंचवड परिसरात नियमितपणे नाट्यछटा स्पर्धेचे आयोजन करीत असल्याने बालवयापासून मुलांमध्ये कलेची आवड निर्माण होत असून त्यांच्यातील आत्मविश्वास वाढलेला दिसून येत आहे. स्पर्धकांमधील अभिनयाची जाण बघून या बालकलाकारांना घेऊन व्यावसायिक नाटकाची निर्मिती करणार आहे.’
उदय कुलकर्णी म्हणाले, ”स्पर्धकांचे सादरीकरण पाहिल्यानंतर पुढील वर्षी खुल्या गटात नाट्यछटा सादर करायला आवडेल.’
अपर्णा गोवंडे म्हणाल्या, ‘अभ्यासाबरोबर विविध कलांचे संस्कार मुलांवर झाले पाहिजेत.’ प्रकाश पारखी यांनी प्रास्ताविक केले. मंजिरी भाके यांनी सूत्रसंचालन केले. पाहुण्यांचा परिचय नेहा कुलकर्णी, बक्षीस वाचन अशोक अडावदकर यांनी केले तर उज्ज्वला केळकर यांनी आभार मानले.
दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धेचा निकाल:
शिशुगट : रियाज माने (प्रथम), चातुर्या जगताप (द्वितीय) , गार्गी भोर तृतीय) ,नारायणी मोरे, रेवा इनामदार ( उत्तेजनार्थ )
गट पहिली-दुसरी : चारवी चालखोर (प्रथम) , यज्ञा पाटील (द्वितीय) ,वरद फटांगळे ( तृतीय ) , दिव्या भगत, कौमुदी खिंवसरा, मनस्वी अत्रे (उत्तेजनार्थ)
गट तिसरी-चौथी : आराध्य कणसे (प्रथम), श्रीमयी वायचळ (द्वितीय) , अन्वी फटांगळे (तृतीय) , मनस्वी डूरे, स्वराली घवले, विरा खैरे, मनस्वी देशपांडे (उत्तेजनार्थ )
गट पाचवी-सहावी : काव्या बोरकर (प्रथम) , निहिरा दिकोंडा (द्वितीय), विराज कुलकर्णी (तृतीय), जान्हवी मुळूक, ओवी कुलकर्णी, ध्रुव खिंवसरा, सान्वी पत्की (उत्तेजनार्थ )
गट सातवी-आठवी : ऋग्वेद अराणके (प्रथम), ओम घंटी (द्वितीय), सिद्धांत दरेकर (तृतीय)
गट नववी-दहावी : सान्वी भाके ( प्रथम), सांची काकडे (उत्तेजनार्थ )
खुला गट : तेजल महाजन ( प्रथम) , दिपाली कुलकर्णी, दिपाली खिंवसरा (उत्तेजनार्थ )