Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

29th October 2026
गुन्हेगारी

उसने दिलेले पैसे परत न दिल्याचा राग मनात धरुन गळा आवळून खून!

उसने दिलेले पैसे परत न दिल्याचा राग मनात धरुन गळा आवळून खून!

पिंपरी : उसने दिलेले पैसे परत न करणे आणि बहिणीशी बोलू नको अशी समज दिल्याचा राग मनात धरून तिघा जणांनी एका तरुणाला बेदम मारहाण करत गळा आवळून त्याचा खून केला. ही घटना शुक्रवार 17 जुलै रोजी माण येथील राक्षेवस्ती परिसरातील एका शेतात घडली. गणेश रंगनाथ मोगरे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

रंगनाथ अंकुश मोगरे (वय 43, रा. पारखीवस्ती, माण, मूळ- रामपुरी खुर्द, पाथरी ,परभणी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रणव वाळेकर (रा. माण), अनिकेत शिंदे (रा.माण), अथर्व चिव्हे (रा. चिव्हेवाडी, पुरंदर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी प्रणव आणि अनिकेत या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश याने आरोपी प्रणव याचे उसने घेतलेले पैसे परत केले नव्हते. तसेच फिर्यादीच्या मुलीशी बोलू नको अशी समजही त्यांनी प्रणवला दिली होती. या कारणाचा राग मनात धरून तिन्ही आरोपींनी गणेशला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर प्रणव याने गणेशचा गळा आवळून त्याचा खून केला. हिंजवडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करत आहेत.

viara vcc
viara vcc

संघटित गुन्हेगारी टोळीकडून बारा लाखाची फसवणूक!
पिंपरी : बँक खाते उघडून संघटित गुन्हेगारीच्या उद्देशाने त्याचा वापर करत देशभरातील सात नागरिकांची बारा लाख रुपयाहून अधिक रकमेची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी एका तरुणासह त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना एक जानेवारी ते 30 जून 2026 या कालावधीत भोसरी लांडेवाडी चौक परिसरात घडली.

पूजा चव्हाण महिला पोलीस शिपाई, भोसरी पोलीस ठाणे यांनी फिर्याद दाखल केली आहे. शिवकुमार अमोल राव धोटे रा. मोर्शी ग्रामीण, अमरावती) आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने साथीदारांसह कट रचून बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये खाते उघडले. या खात्याच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करत देशभरातील सात नागरिकांची बारा लाख 31 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. भोसरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक लबडे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"