वडीलोपर्जीत जमिनीच्या वादातून कोयत्याने वार करून खून; दोघे अटकेत

पिंपरी : वडीलोपर्जीत जमिनीच्या वाटपाच्या वादातून एका व्यक्तीचा कोयत्याने वार करून खून करण्यात आला. ही घटना रविवार 26 एप्रिल रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास रा. जांभळीचे रान, जाधववाडी, नवलाख उंबरे, ता. मावळ येथे घडली. याप्रकरणी एका महिलेने तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.रवींद्र उर्फ रवी जाधव (वय 44) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

विशाल सुखदेव जाधव (वय 21, रा. खेड कोर्टाजवळ पाण्याचे टाकी शेजारी, खेड), ओमकार किरण सोळशे वय 22 सध्या टिनेवाडी रोड, सिद्धेश्वर कॉलनी, अनुलक्ष्मी बिल्डिंग, रूम नंबर 9, खेड, मूळ रा. पोखरी, ता. खेड) व अन्य दोन अज्ञात इस्मविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपी एक व दोन यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी क्रमांक एक व त्याचे इतर तीन अनोळखी साथीदार असे गाडीने येऊन पीएमपीएमआरडीए पाईपलाईनचे मिळणारे पैसे व जमिनीचे वाटपाचे कारणावरून फिर्यादी यांचा मुलगा रवींद्र उर्फ रवी जाधव (वय 44) यास हाताने मारहाण करून आरोपी क्रमांक एक व त्याच्या साथीदारांनी त्यांचे हातातील कोयत्याने फिर्यादी यांच्या मुलाच्या मानेवर, गळ्यावर, खांद्यावर, तोंडावर, डोक्यात कोयत्याने वार करून खून केला. तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रेडेकर हे तपास करत आहेत.

