फक्त मुद्द्याचं!

25th April 2026
पिंपरी-चिंचवड

पिंपळे गुरव,नवी सांगवी येथील अनधिकृत बांधकामांवर महानगरपालिकेची कारवाई!

पिंपळे गुरव,नवी सांगवी येथील अनधिकृत बांधकामांवर महानगरपालिकेची कारवाई!

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाच्या वतीने शहरातील विविध भागांमध्ये अनधिकृत बांधकामांविरोधात व्यापक कारवाई मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेदरम्यान ड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत पिंपळे गुरव येथील ५३० चौ.मी. तसेच ह क्षेत्रीय कार्यालयांतर्गत नवी सांगवी परिसरातील १ हजार ५४५ चौ.मी. अनधिकृत पद्धतीने उभारण्यात आलेल्या आरसीसी बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. तसेच इतर नियमबाह्य उभारण्यात आलेली बांधकामे देखील पाडण्यात आली.

viara vcc
viara vcc

मागील आठवड्यात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयनिहाय करण्यात येणाऱ्या अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांविरोधातील धडक निष्कासन कारवाईचा आढावा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नुकताच घेतला. त्यानंतर शहरातील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांविरोधात कारवाई अधिक सक्त करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित अधिकाऱ्यांनी शहरातील विविध भागांमध्ये व्यापक कारवाई मोहीम हाती घेतली आहे.

ड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत क्षेत्रीय अधिकारी पूजा दुधनाळे यांच्या नेतृत्वात वार्ड क्र. २९, पिंपळे गुरव येथील गणेशनगर, साईनाथनगर, लक्ष्मीनगर परिसरातील एकूण ५३० चौ.मी. आरसीसी बांधकामांवर निष्कासन कारवाई करण्यात आली. या कारवाईवेळी उपअभियंता शाम गर्जे, बीट निरीक्षक विक्रम चव्हाण, राहुल निकम, उमेश लोंढे, ओंकार देशमुख, पूजा राठोड तसेच १३ एमएसएफ जवान, ७ मजूर, २ पोलीस, २ ट्रॅक्टर ब्रेकर आणि १ जेसीबी सहभागी होते.

ह क्षेत्रीय कार्यालयांतर्गत वार्ड क्र. ३१ मधील नेताजी नगर, गांगर्डे नगर, विनायक नगर, गजानन नगर या भागात क्षेत्रीय अधिकारी पूजा दुधनाळे यांच्या नेतृत्वात एकूण १ हजार ५४५ चौ.मी. आरसीसी बांधकामांवर निष्कासन कारवाई करण्यात आली. या धडक कारवाईत उपअभियंता प्रताप मोरे, कनिष्ठ अभियंता जयवंत रोकडे, बीट निरीक्षक शाबोद्दिन बागबान, रोहन कांबळे, प्रफुल्ल भोकरे, सुरज माने तसेच १८ एमएसएफ जवान, १० मजूर, २ ट्रॅक्टर ब्रेकर आणि १ जेसीबीच्या सहाय्याने ही कारवाई पार पडली.

पिंपरी चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांवर कठोर कारवाई करण्यात यावी. या कारवाईचा नियमित आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांनी सातत्याने पाहणी करावी. रस्त्यावर स्टॉल लावणाऱ्या फेरीवाल्यांवर देखील कारवाई करण्यात यावी. -डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"