Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

16th September 2026
गुन्हेगारी

सासू वर कोयत्याने वार केल्याने गंभीर जखमी; जावई अटकेत!

सासू वर कोयत्याने वार केल्याने गंभीर जखमी; जावई अटकेत!

पिंपरी : आम्ही आल्यापासून सारखेच पती-पत्नीमध्ये वाद चालू आहेत आम्ही जातो म्हणालो, तर आम्हाला जाऊ देत नाही, तुमचं नक्की काय चालू आहे असे सासू जावयाला म्हणाल्याने जावयाला राग आला. त्याने किचनमध्ये जाऊन कोयता आणून सासूच्या डोक्यावर व हातावर वार करून जिवे मारण्याच्या उद्देशाने गंभीर जखमी केले. ही घटना मंगळवार 15 सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास संजय गांधी नगर, गणपती मंदिराजवळ मोशी येथे घडली.

viara vcc
viara vcc

या प्रकरणी महिलेने (वय 24, रा. उल्कानगरी, गुलाब कुंज, सहयोग नगर, छत्रपती संभाजी नगर) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .संजय त्रिंबक रगडे (वय 35, रा. संजय गांधी नगर, गणपती मंदिर जवळ मोशी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

indra dairy
indra dairy

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांच्या बहिणीस आरोपी म्हणत होते की, तू माझ्याशी चांगली वागत नाही. यावरून त्यांच्यात वाद चालू होता. त्यावेळी आरोपीची सासू किचनमध्ये जेवण करत होती. तेथूनच ती जावयाला म्हणाली की, आम्ही आल्यापासून सारखेच तुमचे वाद चालू आहेत. आम्ही जातो म्हणालो तर आम्हाला जाऊ देत नाही. तुमचं नक्की काय चालू आहे असे म्हणाल्याने या गोष्टीचा आरोपीस राग आला. त्याने किचनमध्ये रागाने जाऊन तेथे असणारा लोखंडी कोयता घेऊन सासूला म्हणाला की. तुझा आता जीव घेतो. घरामध्ये असणाऱ्या लोखंडी कोयत्याने तिच्या डोक्यावर व हातावर वार करून गंभीर जखमी करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक तळेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील हे तपास करीत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"