फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
पिंपरी-चिंचवड

टाकाऊ वस्तूंचा सुयोग्य वापर करत बदलला परिसराचा चेहरा मोहरा!

टाकाऊ वस्तूंचा सुयोग्य वापर करत बदलला परिसराचा चेहरा मोहरा!

पिंपरी चिंचवड शहरात वेस्ट टू आर्ट” उपक्रमासाठी महापालिकेचा अभिनव उपक्रम
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने शहरातील कचरा संवेदनशील ठिकाणांचे रूपांतर करण्यासाठी हाती घेतलेल्या टाकाऊ वस्तूंच्या कलात्मक पुनर्वापर उपक्रमामुळे परिसराचा चेहरामोहरा बदलत आहे. भोसरी प्रभाग क्रमांक ०७ भारत गॅस एजन्सी नजीक, विकास कॉलनीतील जागेचे सौंदर्यीकरण नुकतेच करण्यात आले असून, ही कलाकृती स्थानिक नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली आहे.

viara vcc
viara vcc

पिंपरी चिंचवड शहरात महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल आणि सहा.आयुक्त अमित पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली “वेस्ट टू आर्ट” हा उपक्रम राबविण्यात येत आहे. इ क्षेत्रीय अधिकारी तानाजी नरळे यांच्या नेतृत्वात प्रभाग क्रमांक ०७ अंतर्गत इ क्षेत्रीय कार्यालयाने राबवलेल्या या उपक्रमात जुने टायर, फाटलेली पोस्टर्स, जुन्या लाकडी फळ्या, बांबू, जुन्या विटा अशा टाकाऊ वस्तूंना नवीन कलात्मक रूप देण्यात आले. रंगीबेरंगी रांगोळी, स्वच्छतेचे संदेश देणारे फलक आणि आकर्षक मांडणीमुळे या जागेचा संपूर्ण कायापालट झाला आहे. टाकाऊ कचऱ्यापासून कलात्मकता हा उपक्रम पिंपरी चिंचवड शहरासाठी एक प्रेरणादायी पाऊल ठरत आहे.

“वेस्ट टू आर्ट” उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी सहा.आरोग्य अधिकारी राजेश भाट, मुख्य आरोग्य निरीक्षक अतुल सोनवणे, आरोग्य निरीक्षक गौरव गायकवाड तसेच अन्य महापालिका अधिकारी व कर्मचारी यांनी यासाठी विशेष योगदान दिले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"