आमदार शेळके हत्या कट रचल्याचेच उघड ; सखोल चौकशी करण्यासाठी SIT स्थापन!

मुंबई : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मावळचे आमदार सुनील शेळके यांची हत्या कट रचल्याचे उघड झाले असून यासंदर्भात त्यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडून सभागृहाचे लक्ष वेधून घेतले ., खून करण्याच्या कटाची सखोल चौकशी करण्यासाठी एस आय टी तपास महत्त्वाचा आहे असा दावा आमदार शेळके यांनी सभागृहात केला . त्यांच्या मागणीचा विचार करून गृहराज्यमंत्री योगेश योगेश कदम यांनी एसआयटी तपास करण्यास टाळाटाळ केली मात्र लोकप्रतिनिधीच्या रक्षणाचा प्रश्न असल्याने तातडीने एसआयटी स्थापन करण्यात आली .

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या दरोडा विरोधी पथकाने गुप्त माहितीनुसार तळेगाव दाभाडे परिसरात 26 जुलै 2023 रोजी मोठी कारवाई केली होती. यामध्ये सुरुवातीला दोन गुन्हेगार पकडण्यात आले ,त्यानंतर तपासाचा विस्तार वाढत जाऊन एकूण सात सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली . नऊ पिस्तूल , 42 जिवंत काढतुशे, कोयते असा प्राणघातक शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. या गुन्हेगारांवर खून ,खुनाचा प्रयत्न, जाळपोळ, खंडणी, बेकायदेशीर हत्यारे बाळगणे, लूट ,तोडफोड असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. हे गुन्हेगार मध्यप्रदेश, जालना, वडगाव, काळेवाडी परिसरातले असून त्यांच्या अटकेनंतर तपासात आमदार शेळके यांचा खून करण्याचा उद्देश असल्याचे आढळून आले ,आमदार शेळके यांच्याशी या गुन्हेगारांचे कोणतेही वैयक्तिक वैर नाही . त्यामुळे या गुन्हेगारांच्या पाठीमागे कोण सूत्रधार आहे. हे शोधून काढणे आवश्यकआहे असे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शेळके यांच्या लक्षवेधीला उत्तर देताना सांगितले .
पकडलेले गुन्हेगार दीड वर्षे तुरुंगात होते .नंतर त्यांना दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले, मात्र तडीपार असूनही हे गुन्हेगार पुणे जिल्ह्यात लपून येतात असा आरोपही शेळके यांनी केला .हा गंभीर प्रकार लक्षात घेऊन योगेश कदम यांनी विधानसभेत उत्तर देताना प्रथम एसआयटी नेमण्याचा निर्णय पुढील सात दिवसात घेण्यात येईल अशी घोषणा केली परंतु लगेच त्यांनी एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली. या सात गुन्हेगारांपैकी काहींना शस्त्र पुरवणारा देवराज नावाचा मध्य प्रदेशातील व्यक्ती असून त्याची माहिती ही संबंधित राज्य सरकारला देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले या प्रकरणातील मूळ सूत्रधार कोण याचा सखोल तपास लावण्याचे आश्वासन कदम यांनी दिले .