Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

7th July 2026
पुणे

पवना धरण सांडव्याद्वारे नदीपात्रामध्ये नियंत्रित 15 जुलै पर्यंत विसर्ग!

पवना धरण सांडव्याद्वारे नदीपात्रामध्ये नियंत्रित 15 जुलै पर्यंत विसर्ग!

पवना धरण सद्यस्थितीमध्ये 72% भरले

पिंपरी : पवना नदी काठच्या सर्व नागरीकांना सूचित करण्यात येत आहे, की पवना धरण सद्यस्थितीमध्ये 72% भरलेले आहे. पाणलोट क्षेत्रात पाऊस चालू असून धरणामध्ये मोठा येवा प्राप्त होत आहे. तरी, धरणातील पाणीसाठा नियंत्रित करणेकरिता आज दुपारी 12:00 वाजले पासून सांडव्याद्वारे नदीपात्रामध्ये नियंत्रित पद्धतीने मुक्त विसर्ग करण्यात येणार आहे. प्रथम सांडव्यावरील विसर्ग 400 क्युसेक्स* इतका राहणार असून, सदरील विसर्ग हा दि. 15/07/2025 पर्यंत चालू राहणार आहे.

viarasmall
viarasmall

पाणलोट क्षेत्रातील पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानुसार धरणातून नदीपात्रात होणारा विसर्ग कमी/जास्त होण्याची शक्यता आहे. तरी पवना नदी काठच्या सर्व नागरीकांना सूचित करण्यात येते की, कृपया कोणीही नदीपात्रात उतरू नये. नदी मधील पाण्याचे पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास ती तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावित. सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात, सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घेत जलसंपदा विभागास व प्रशासनास सहकार्य करावे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"