फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
पिंपरी-चिंचवड

बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालयाच्या कामात गैरव्यवहार : मारुती भापकर

बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालयाच्या कामात गैरव्यवहार : मारुती भापकर

सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी
पिंपरी : चिंचवड संभाजीनगर येथील निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालयाच्या कामासाठी नव्याने काढलेली निविदा तातडीने रद्द करावी. तसेच, नवीन कामासह आतापर्यंत झालेल्या कोट्यवधींच्या कामातील गैरव्यवहार व भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी केली आहे.

या संदर्भात भापकर यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पत्र पाठविले आहे. तसेच, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे ही निविदा रद्द करण्याची मागणी केली आहे.
भापकर यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, प्राणिसंग्रहालयाच्या सुशोभीकरणावर आतापर्यंत २० कोटी रुपये महापालिकेने खर्च केले. त्यानंतर आणखी २४ कोटी २ लाख १६ हजार ६८ रूपये खर्चाची निविदा नव्याने काढण्यात आली. या निविदेत देखील कमी खर्चात काम करून देणा-या ठेकेदाराच्या तुलनेत ज्यादा दराने काम करणा-या ठेकेदाराला काम देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे. या कामात स्कायवे इंन्फ्राप्रोजक्टस या कंपनीची २ टक्के कमी दराची २३ कोटी ६४ लाख ९४ हजार ९२६ रूपये खर्चाची निविदा स्वीकृत करण्यात आली. प्रत्यक्षात हायवे कन्ट्रक्शन नावाच्या कंपनीने १०.८९ टक्के कमी दराची निविदा सादर केली होती. तुलनेने हा खर्च कमी असताना गुणांकन पध्दत राबविल्याचे सांगत पालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान केले जात आहे. यामध्ये स्थापत्य उद्यान विभागाचा कारभार संशयास्पद असून याची चौकशी करावी. यापूर्वीचा सल्लागार व ठेकेदारांनी अधिका-यांना हाताशी धरून लूट केली. तोच प्रकार या नवीन निविदेमध्ये प्रथमदर्शनी दिसून येत आहे. प्राणीसंग्रहालयाची ही निविदा तातडीने रद्द करा, असे भापकर यांनी म्हटले आहे.

viara ad
viara ad

सव्वादोन कोटींचे नुकसान झाल्याचा आरोप
प्राणिसंग्रहालयाच्या कामासाठी काढलेल्या या निविदेत दोन्ही ठेकेदारांनी सादर केलेले दर आणि महापालिकेने स्वीकृत केलेले दराची तुलना केली. यामध्ये महापालिकेचे एकूण २ कोटी २४ लाख ३८ हजार रुपयांचे आर्थिक नुकसान होत असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. ही बाब गंभीर असून महापालिका आयुक्त व त्यांच्या प्रशासनाची ही कृती महापालिकेच्या आर्थिक हिताविरुध्द आहे, असा आरोप भापकर यांनी केला आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"