उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यात एमआय संघ ६ गडी राखून विजयी!

दिवेकर क्रिकेट प्रीमियर लीग; अमेय देवस्थळे सामनावीर
पिंपरी : दिवेकर क्रिकेट अकॅडमी तर्फे राजमाता जिजाऊ नगर रावेत येथे आयोजित करण्यात आलेल्या दिवेकर क्रिकेट प्रीमियर लीग मध्ये शनिवार १६मे रोजी झालेल्या उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यात जीटी संघ विरुद्ध एमआय संघ यांच्यात झालेल्या सामन्यात एमआय संघ ६ गडी राखून विजयी झाला. या सामन्यात अर्धशतकासह १८ धावांत ३ बळी घेणारा अमेय देवस्थळे सामनावीर ठरला.

जीटी संघ ३६.३ षटके सर्वबाद १४४ धावा:-आरुष प्याती १९ श्रीशांत चव्हाण १७ आतिष कोळेकर १९/३ अमेय देवस्थळे १८/३.
एमआय २५.३ षटके ४ बाद १४५ धावा:- वरद भालेराव १३ श्लोक सूर्यवंशी २० अमेय देवस्थळे ५७ पयोज गायकवाड १५ वेध पाटील ५१/३.

