कल ओळखून ध्येयनिश्चिती करावी: महेश दळे

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : माहितीच्या, ज्ञानाच्या, तंत्रज्ञानाच्या युगात आपले कौशल्य विकसित करून, आपला कल ओळखून आपली ध्येयनिश्चिती करावी, त्याला कष्टाची जोड द्यावी व निवडलेल्या क्षेत्रात उज्वल यश संपादन करावे, असे मत डॉ. महेश दळे यांनी व्यक्त केले.
पारनेर तालुका मित्रमंडळ, पुणे आणि पिंपरीतर्फे आयोजित कार्यक्रमात गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. सेवानिवृत्त वनाधिकारी रामदास पुजारी यांच्या ‘ उद्याच्या श्वासासाठी ‘ या कवितासंग्रहाचे प्रकाशन झाले. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष हौसाराम घोडके, उपाध्यक्ष मधुकर शिरोळे, भास्करराव शेळके, डॉ.दत्ता ठुबे, डॉ अरुणा ठुबे, सुजाता ठुबे, प्रा. विजय लोंढे, सुनील पोटे, बाजीराव जगदाळे, अशोक वाबळे, डॉ. बाळासाहेब बांडे, सखाराम गागरे, रामदास शिर्के, माधव गायके, किरण तिकोणे, प्रमोद जगदाळे, राजाराम मुंडे उपस्थित होते. प्रा. सुनीलराजे निंबाळकर यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा.भाऊसाहेब नरड यांनी आभार मानले,
रफिक नाईकवडी म्हणाले, ”शिक्षण, व्यवसाय व नोकरीनिमित्त पिंपरी आणि पुण्यात येऊन स्वकर्तृत्वाने पुढे जाऊन विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या गुणवंतांचा आदर्श पुढे ठेवून विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून उत्तुंग यश संपादन करावे.”
विश्वनाथ कोरडे म्हणाले, ‘सामाजिक बांधिलकी जपण्याच्या भावनेतून, शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची गरज आहे. ‘ विजयकुमार ठुबे यांनी प्रास्ताविक केले.