अंमली पदार्थ गांजा विक्री करणाऱ्या व्यक्तीस अटक!

पिंपरी : बेकायदेशीरपणे अंमली पदार्थ गांजा विक्री करणाऱ्या व्यक्तीस पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना सोमवार 4 चार मे रोजी दुपारी सव्वा तीनच्या सुमारास शंकर बोडके यांच्या पत्र्याच्या शेड जवळ बोडकेवाडी, माण, ता. मुळशी येथे हिंजवडी पोलिसांनी छापा टाकून 78 हजार 500 रुपये किंमतीचा 1571 ग्रॅम वजनाचा अमली पदार्थ गांजा विक्रीकरिता बाळगल्याने एका व्यक्तीस अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संजय विश्वनाथ राय (वय 57, रा. शंकर बोडके यांच्या पत्राच्या शेडमध्ये बोडकेवाडी, माण, ता. मुळशी, मूळ रा.- उत्तर 24, परगाना, ता. गायघटा जि. बनगाव, पश्चिम बंगाल) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. नरेश अनंतराव बलसाने सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, हिंजवडी पोलीस स्टेशन यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी अंमली पदार्थ गांजा जप्त केला आहे. हिंजवडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कांदे हे तपास करत आहेत.

देहूरोड येथे गांजा विक्री ; एकास अटक
पिंपरी : बेकायदेशीरपणे अंमली पदार्थ गांजा विक्री करणाऱ्या व्यक्तीस पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना सोमवार 4 मे रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हॉटेल महाराष्ट्र समोर देहूरोड येथे घडली.
या प्रकरणी रणधीर रमेश माने पोलीस शिपाई, अमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अनिल जगन्नाथ बोरसे (वय 42, रा. घर नंबर 70, आंबेडकर नगर देहूरोड) व महिला आरोपी यांच्याविरुद्ध देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी क्रमांक एक यास अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी क्रमांक एक याने आपल्या ताब्यात बारा हजार शंभर रुपये किमतीचा 242 ग्रॅम वजनाचा अमली पदार्थ गांजा बेकायदेशीर रित्या विक्री करण्यासाठी जवळ बाळगला. आरोपीने गांजा कोठून आणला याचा शोध पोलिसांनी घेतला असता आरोपी क्रमांक दोन या महिलेकडून विक्रीकरिता आणला असल्याचे सांगितले. पोलिसांनी अमली पदार्थ गांजा, एक मोबाइल हँडसेट, वजन काटा, असा एकूण 22 हजार 350 रुपये किंमतीचा माल जप्त केला. देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक डोंगळे हे तपास करत आहेत.

