Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

12th September 2026
गुन्हेगारी

मोलकरनीने 3 लाख 27 हजार रुपयांच्या दागिन्यांवर मारला डल्ला!

मोलकरनीने 3 लाख 27 हजार रुपयांच्या दागिन्यांवर मारला डल्ला!

पिंपरी : घर कामासाठी असलेल्या मोलकर्णीने घरातून तीन लाख सत्तावीस हजार पाचशे रुपयांचे किंमती दागिने संमतीशिवाय चोरून नेले. ही घटना 22 फेब्रुवारी ते नऊ जून या कालावधीत ई- 604 ,कोहिनूर वायुना हाउसिंग सोसायटी, पिंपरी) येथे घडली.

याप्रकरणी श्रीमती शिल्पा दीपक हटंगडी (वय 50) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गांधीनगर येथील 40 वर्षीय महिलेविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी या फिर्यादीच्या कडे मोलकरीण म्हणून काम करत होत्या. आरोपीने कोणाच्याही संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने घरातून तीन लाख सत्तावीस हजार पाचशे रुपये किंमतीचे दागिने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी चोरून नेले. पिंपरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वरे हे तपास करत आहेत.

viara vcc
viara vcc

देशी विदेशी दारूची अवैधरित्या विक्री;गुन्हा दाखल!
चाकण : देशी विदेशी दारूची अवैधरित्या विक्री करत असताना अकरा हजार तीनशे दहा रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई बुधवार 10 जून रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास आंबेठाण गावचे हद्दीतील कोरेगाव फाटा येथील अधिराज चायनीज सेंटरच्या मोकळ्या जागेत करण्यात आली.

साहिल प्रदीप सांडभोर पोलीस शिपाई, उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन यांनी उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. गणेश बबन पडवळ (वय 32, आंबेठाण, ता. खेड), कृष्णा नामदेव खोडवे (वय 30, रा. कोरेगाव फाटा, आंबेठाण, ता. खेड, मूळ पत्ता- मोहोगाव, ता. अहमदपूर, जि. लातूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी क्रमांक एक व दोन यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्या करिता देशी-विदेशी दारूची अवैधरित्या विक्री करीत असताना पोलिसांच्या छाप्यात 11,310 रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी तो जप्त केला. उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे टिळेकर हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"