Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

4th October 2026
गुन्हेगारी

शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवण्याचे अमिष; 21 लाख 37 हजार रुपयांची फसवणूक!

शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवण्याचे अमिष; 21 लाख 37 हजार रुपयांची फसवणूक!

तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
पिंपरी : शेअर मार्केट व फॉरएक्स ट्रेडिंग मध्ये पैसे गुंतवून दरमहा दहा टक्के प्रमाणे चांगला नफा मिळवून देतो असे आमिष दाखवून एका महिलेची 21 लाख 37 हजार 44 रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना एक फेब्रुवारी 2024 पासून आज पर्यंत साईराज रेसिडेन्सी, बी- 10, फ्लॅट नंबर 18, नवी सांगवी, पिंपळे गुरव येथे घडली.

याप्रकरणी 41 वर्षीय महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बाजीराव विलास पाटील (वय 48), महिला आरोपी (वय 44), सर्वेश बाजीराव पाटील (वय 18, सर्व रा. फ्लॅट नंबर 26, शुभ लाभ राजपाल बिल्डिंग, साईराज रेसिडेन्सी, पिंपळे गुरव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

viara vcc
viara vcc

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी एक ते तीन यांनी फिर्यादीस शेअर मार्केट व फॉरेएक्स ट्रेडिंग मध्ये पैसे गुंतवून दरमहा दहा टक्के प्रमाणे चांगला नफा मिळवून देण्याचे अमिष दाखवले. सुरुवातीस वेळोवेळी थोड्या प्रमाणात नफा परत देऊन विश्वास संपादन केला. मात्र त्यानंतर फिर्यादीला नफा न देता व ट्रेडिंग करिता ऑनलाइन व रोख स्वरूपात गुंतवलेले 21 लाख 37 हजार 44 रुपये परत न देता आर्थिक फसवणूक केली. सांगवी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील तपास करीत आहेत.

indra dairy
indra dairy

मंगळसूत्र खरे आहे की, खोटे सांगण्याचा बहाणा करून फसवणूक!
पिंपरी : सोनार असल्याचे सांगून एका महिलेचा विश्वास संपादन केला आणि त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र खरे आहे की खोटे आहे हे तपासण्याचा बहाना करून हातात घेऊन परत न करता फसवणूक केली. ही घटना 2 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास मोहिते वाडी, ता. खेड, चाकण- शिक्रापूर रोडवर ,गुरुमाऊली पेट्रोल पंपाच्या समोर घडली.

या प्रकरणी एका पन्नास वर्षे महिलेने (रा. मोहितेवाडी, ता. खेड, जि. पुणे) यांनी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अनोळखी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चाकण- शिक्रापूर रोडवर, गुरुमाऊली पेट्रोल पंपाच्या समोर, नाथ कृपा टी स्टॉल येथे दुचाकीवरून आलेल्या काळ्या रंगाचे जॅकेट घातलेले दोन अनोळखी व्यक्ती अंदाजे (वय 25 ते 30 ) यांनी फिर्यादीला आम्ही सोनार असल्याचे सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. फिर्यादीच्या गळ्यातील चाळीस हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याचे आठ ग्रॅम वजनाचे काळे मणी, सोन्याचे मणी व दोन सोन्याच्या वाट्या असलेले सोन्याचे मंगळसूत्र हे खरे आहे की खोटे आहे हे तपासण्याचा बहाना करून हातात घेऊन फिर्यादीला परत न करता दुचाकीवरून निघून गेले. फिर्यादीची फसवणूक केली. चाकण उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नरवडे सहाय्यक पोलीस निरीक्षक दगडे हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"