औद्योगिक क्रीडा संघटनेची ६३ वी कॅरम स्पर्धा संपन्न!

पिंपरी : औद्योगिक क्रीडा संघटनेच्या ६३वी कॅरम स्पर्धा एसकेएफ बेअरिंग इंडिया एम्प्लॉइज युनियन हॉल ,चिंचवड येथे रविवार रोजी ४ ऑक्टोबर रोजी संपन्न झाली. ४७ कंपन्यांच्या,पुरुष व महिला २२९ खेळाडूंनी यांत भाग घेतला. एसकेएफ इंडिया,चिंचवड यांनी आयोजित केली. यावर्षी प्रथमच कामगार क्षेत्रातून निवृत्त झालेल्या कामगार व कर्मचाऱ्यांसाठीही (पुरुष व महिला)स्पर्धा घेण्यात आली

या स्पर्धेमध्ये एसकेएफ, पीसीएमसी,बजाज ऑटो आकुर्डी,बजाज ऑटो चाकण,जेसीबी इंडिया,महिंद्रा सीआयई,डीआरडीओ,अम्युनिशन फॅक्टरी,ओएफडीआर,५१२आर्मी,भारत फोर्ज,इन्फोसिस,इटॉन इंडिया,टेट्रापॅक,टीकेआईएल,महिंद्रा अँड महिंद्रा चाकण,टाटा मोटर्स,इएसव्हीइइ,थरमॅक्स,टेक महिंद्रा,मर्सिडीज,सँडविक एशिया,एनप्रो,किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड, फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स,टी सिस्टीम,भारत फोर्ज,तुषार इंटरप्राईजेस ,प्राज इंडस्ट्रीज, विलो माथेर अँड प्लॅट पंप्स,फिलिप्स,टीसीएस, टेक महिंद्रा,ऑरपॅक,एन्प्रो,फ्लीटगार्ड फिल्टर्स,अम्फेनॉल,अस्टेमो एफआयइ,अक्सेंचर,सायरिनो वगैरे स्पर्धा ४(एकेरी व दुहेरी पुरुष,एकेरी व दुहेरी महिला)गटामध्ये झाली.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण वसंत ठोंबरे,नरेंद्र कदम,संतोष शिंदे,विजय हिंगे,मंदार कुलकर्णी,अंकित दौंड,नितीन कदम यांच्या हस्ते झाले; याप्रसंगी स्पर्धेविषयी खेळाडूंना मार्गदर्शन सचिव वसंत ठोंबरे यांनी केले. याप्रसंगी संतोष सोनटक्के (माजी मार्केटिंग हेड साउथ इंडिया(टेट्रापॅक),औद्योगिक क्रीडा स्पर्धाप्रमुख हरी देशपांडे,,अमित कदम,अतुल काळोखे(बजाज ऑटो आकुर्डी,ॲडमिन मॅनेजर),नितीन कदम(टाटा मोटर्स स्पोर्ट्स कमिटी),दयानंद नरवडे(जेसीबी एचआर मॅनेजर),दत्ता गायकवाड(सिनीयर एचआर मॅनेजर,महिंद्रा अँड महिंद्रा), मिनार गजने,सचिन कांबळे(जेसीबी स्पोर्ट्स कमिटी),किरण कंक,संतोष शिंदे,मेनिनो कार्डोझ(एसकेएफ स्पोर्ट्स कमिटी)दुष्यंत गायकवाड(सँडविक एशिया स्पोर्ट्स कमिटी)हेही उपस्थित होते.पारितोषिक वितरणाशेवटी हरी देशपांडे यांनी आभार मानले.या स्पर्धेसाठी YouTube प्रक्षेपण मंदार कुलकर्णी यांनी केले.स्पर्धेसाठी प्रदीप बारटके,रोहित कदम(चीफ रेफ्री)यांचे साह्य लाभले.
पारितोषिक वितरणच्या सुरुवातीला प्रास्ताविक प्रदीप वाघ यांनी तर संस्थेच्या वाटचालीविषयी नरेंद्र कदम यांनी माहिती दिली.
स्पर्धेचे अंतिम फेरीचे निकाल खालील प्रमाणे आहेत.
I. निवृत्त कर्मचारी गट:- फेरी उपउपांत्य(एकेरी):- (सूर्यकांत केसरकर यांनी विजेतेपद तर गिरीश जोशी यांना उपविजेतेपद मिळाले)
अंतिम फेरी
सूर्यकांत केसरकर विजयी विरुद्ध गिरीश जोशी(४-११)(१३–११)(१६–३)
१) स्मिता घाग (सँडविक एशिया) विजयी विरुद्ध निशा राठी (टेट्रापॅक) (१९-०)(२५–०)
२) प्रणिता पवार (एसकेएफ) पराभूत विरुद्ध निशा पाटील(टेट्रापॅक) (०–२५)(०–२५)
अंतिम फेरी
स्मिता घाग(सँडविक एशिया) विरुद्ध विजयी निशा पाटील(टेट्रापॅक) (८–२५) (०–२५)
निशा पाटील, निशा राठी(टेट्रापॅक) विजयी विरुद्ध सुकन्या भावसार, श्रुतिका जाधव (प्राज इंडस्ट्रीज)(२५–१) (२५–०)
१)नौशाद शहा (टिसीएस) विजयी विरुद्ध सचिन बांदल (टाटा मोटर्स) (३-१७)(१४-१३)(१८–१४)
२)मनोज भोसले(टाटा मोटर्स) विजयी विरुद्ध प्रीतम कटके (अम्युनिशन फॅक्टरी) (१६–८)(०–२५)(१४–१२)
अंतिम फेरी पुरुष गट एकेरी
नौशाद शहा(टिसीएस)विजयी विरुद्ध मनोज भोसले(टाटा मोटर्स) (२१–११)( २५–०)
V. पुरुष गट उपांत्य फेरी (दुहेरी):- शशी गायकवाड मनोज भोसले यांना विजेतेपद तर सचिन बांदल संजय थिटे यांना उपविजेतेपद मिळाले
शशी गायकवाड मनोज भोसले(टाटा मोटर्स)विजयी विरुद्ध सुजित कुमार उके भारत कुंभार(डीआरडीओ)(१५–८)(९–१५)(२०–४)
प्रीतम कटके शैलेश ढवळे (अम्युनिशन फॅक्टरी) विरुद्ध सचिन बांदल संजय थिटे(टाटा मोटर्स)(०–२५) )(४–२५)
अंतिम फेरी
शशी गायकवाड मनोज भोसले(टाटा मोटर्स) विजयी विरुद्ध सचिन बांदल संजय थिटे(टाटा मोटर्स) (२५–०) (२५–०)

