Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

4th October 2026
गुन्हेगारी

ट्रकची चार वाहनांना धडक; एकाचा मृत्यू, दोघेजण जखमी!

ट्रकची चार वाहनांना धडक; एकाचा मृत्यू, दोघेजण जखमी!

बावधन : अशोक लेलँड कंपनीच्या ट्रक वरील चालकाचा ताबा सुटल्याने त्याने चार गाड्यांना धडक दिली. यात दुचाकी वरील पाठीमागे बसलेला व्यक्ती गंभीर दुखापत होऊन त्याच मृत्यू झाला. ही घटना पिरंगुट, ता. मुळशी येथील टाटा मोटर्स शोरूम जवळ, शनिवार 3 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. लक्ष्मण नारायण कुबल (वय 56) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

viara vcc
viara vcc

याप्रकरणी विशाल रामदास काठोडे (वय 31, पोलीस कॉन्स्टेबल, बावधन पोलीस स्टेशन) यांनी फिर्याद दिली आहे. अशोक लेलँड ट्रक चालक विठ्ठल गोरख हिप्परकर (वय 37, रा. मु. पो. वाळखेंडी, ता. जत, जि. सांगली) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

indra dairy
indra dairy

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवार 3 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास टाटा मोटर्स शोरूम जवळ पिरंगुट, ता. मुळशी येथे अशोक लेलँड कंपनीचा ट्रक (एमएच 12 /पीक्यू /7316) वरील चालक विठ्ठल हिपरकर यांनी ट्रक वाहतुकीच्या नियमाकडे दुर्लक्ष करून बेदकारपणाने इतरांच्या जीवितास धोका होईल अशा पद्धतीने ट्रक चालवून आयशर टेम्पो क्रमांक (एमएच 12/ व्हीएफ/ 8164), मोटर सायकल क्रमांक (एमएच 12/ एमसी/ 6248), हायवा ट्रक (एमएच 12/ एचडी/ 2555), होंडा एक्टिवा स्कूटर (एमएच 12/ एमसी /6248) या वाहनांना धडक दिली. दुचाकी क्रमांक (एमएच 12/ एमसी 6248) वरील चालक नितीन बाळासाहेब भिलारे (वय 32) यास गंभीर जखमी केले. व त्याच्या पाठीमागे बसलेला व्यक्ती लक्ष्मण नारायण कुबल (वय 56) यास गंभीर जखमी केले त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

एमएच 12/ डब्ल्यूएल/ 8138) वरील लक्ष्मण रघुनाथ नांगरे (वय 62) हे गंभीर जखमी झाले. जखमी व्यक्तींना रुग्णालयात उपचारासाठी न नेता ट्रक चालक घटनास्थळावरून पळून गेला. या अपघातात दुचाकी वरील दोन जण गंभीर जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे. बावधन पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र मारणे व सारंग ठाकरे हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"