तरुणांकडून देशी बनावटीचे पिस्तूल जप्त!

पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत शारीरिक इजा होईल अशी वस्तू जवळ बाळगण्यास प्रतिबंध असताना आदेशाचा भंग करून एका तरुणाने एक देशी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत काडतूस जवळ बाळगल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई मंगळवार 21 एप्रिल रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कोमल इंडस्ट्रीज ते वाळके मळा कडे जाणाऱ्या रोड जवळ करण्यात आली.

सुधीर हरिश्चंद्र डोळस वय 40, पोलीस कॉन्स्टेबल, दिघी पोलीस स्टेशन, यांनी दिघी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. उमेश उर्फ अजय रेमालीबाई ब्रह्मणे (वय20, शास्त्रीनगर, येरवडा, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवड शहरात व पोलीस आयुक्तालय हद्दीत शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे अथवा बाळगणे याबाबत मनाई आदेश आहे. या मनाई आदेशाचा भंग करून आरोपीने आपल्याजवळ एक देशी बनावटीचे 51 हजार रुपये किंमतीचे पिस्तूल व एक जिवंत काडतुस जवळ बाळगले. दिघी पोलीस ठाण्याचे मुसळे हे तपास करत आहेत.

