Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

6th July 2026
पिंपरी-चिंचवड

सुरक्षा रखवालदार यांना सुरक्षा निरीक्षक पदावर पदोन्नती देण्याबाबत विधी समितीचा ठराव!

सुरक्षा रखवालदार यांना सुरक्षा निरीक्षक पदावर पदोन्नती देण्याबाबत विधी समितीचा ठराव!

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील जे सुरक्षा रखवालदार पदोन्नतीसाठी पात्र असतील त्यांना सुरक्षा सुपरवायझरऐवजी सुरक्षा निरीक्षक पदावर पदोन्नती देण्याबाबतचा महत्त्वपूर्ण ठराव महापालिकेच्या विधी समितीच्या विशेष बैठकीत करण्यात आला आहे. हा ठराव अंतिम मंजुरीसाठी महापालिका सभेसमोर ठेवण्यात येणार आहे. विधी समितीची बैठक सभापती सुजाता बोराटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

viara vcc
viara vcc

या बैठकीला विधी समिती सदस्य तथा नगरसदस्य ज्ञानेश्वर जगताप, विनायक गायकवाड, कुंदा भिसे, श्रुती डोळस, कुशाग्र कदम, शेखर चिंचवडे, वर्षा जगताप, तुषार सहाणे, नगरसचिव उल्हास जगताप यांच्यासह महापालिकेचे उपायुक्त राजेश आगळे, सिताराम बहुरे, संदीप खोत, सहायक आयुक्त अजिंक्य येळे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

बैठकीमध्ये सुरक्षा रखवालदार यांच्या पदोन्नतीबाबत महत्त्वपूर्ण ठराव करण्यात आला. यापूर्वी जे सुरक्षा रखवालदार पदोन्नतीसाठी पात्र असतील, त्यांना सुरक्षा सुपरवायझर या पदावर पदोन्नती देण्यात येत होती. तसेच पात्र सुरक्षा सुपरवायझर यांना सुरक्षा निरीक्षक पदावर पदोन्नती दिली जात होती. मात्र विधी समितीने आता सुरक्षा सुपरवायझर व सुरक्षा निरीक्षक या दोन्ही पदांचे समायोजन करून सुरक्षा निरीक्षक हे एकच पद ठेवून त्यावर पात्र सुरक्षा रखवालदार यांना पदोन्नती देण्याबाबत ठराव केला आहे. याशिवाय बैठकीत होर्डिंग्ज स्ट्रक्चरल ऑडिट, महापालिकेची महसूलवाढ, महापालिकेच्या ताब्यात असणाऱ्या उपलब्ध जागा आदींबाबत चर्चा करण्यात आली.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"