फक्त मुद्द्याचं!

18th June 2025
पिंपरी-चिंचवड

औद्योगिक आणि नागरी विकासाला गती देण्यासाठी महापालिका व एमआयडीसी यांची संयुक्त बैठक संपन्न!

औद्योगिक आणि नागरी विकासाला गती देण्यासाठी महापालिका व एमआयडीसी यांची संयुक्त बैठक संपन्न!

विविध प्रलंबित विषयांबाबत करण्यात आली सकारात्मक चर्चा
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेशी संबंधित महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अखत्यारितील विविध प्रलंबित विषयांबाबत महापालिका आणि औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आज पार पडली.

महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्यासह शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, प्रमोद ओंभासे, सहशहर अभियंता देवन्ना गट्टूवार, अजय सुर्यवंशी, नगररचना उपसंचालक प्रसाद गायकवाड, सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे, मुकेश कोळप, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी विजय बोरूडे, कार्यकारी अभियंता हरविंदरसिंह बन्सल, विजय भोजने, प्रेरणा सिनकर, दीपक पाटील, महेश बरीदे, महेश कावळे, सतिश वाघमारे, सहाय्यक संचालक संदेश खडतरे, एमआयडीसीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी विजय राठोड, प्रादेशिक अधिकारी प्रविण अडसूळ, कार्यकारी अभियंता संजय कोतवाड, सहाय्यक क्षेत्र व्यवस्थापक पी. सी. हसरमनी आदी उपस्थित होते.

महापालिकेशी संबंधित असलेल्या एमआयडीसीकडील विविध प्रलंबित विषयांबाबत बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरात विविध विकास प्रकल्प राबविले जातात. यातील काही प्रकल्पांसाठी आवश्यक जागा एमआयडीसीकडून महापालिकेला दिली जाते. त्याठिकाणी विविध प्रकल्प महापालिकेच्या वतीने उभारण्यात येतात. यासाठी जागा हस्तांतरणाबाबत असलेल्या प्रलंबित प्रक्रियेबाबत बैठकीत चर्चा झाली. तसेच शहरातील काही भागात रहिवाशांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी महापालिका एमआयडीसीकडून पाणी घेते. त्या पाण्याचे दर आणि पाणीपुरवठा वाढीबाबत देखील बैठकीत चर्चा करण्यात आली. याशिवाय एमआयडीसी भागातील रस्त्यांवर नागरी सुरक्षेच्या दृष्टीने महापालिकेकडून सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे. यासाठी एमआयडीसीकडून आवश्यक मंजूरीकरिता असलेल्या प्रलंबित बाबींबाबत देखील बैठकीत चर्चा झाली. बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्यात आले, त्यामुळे बहुतांशी प्रलंबित विषय मार्गी लागणार आहेत.

viara ad
viara ad

महापालिका व एमआयडीसीतील सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी एकत्रित बैठक घेऊन प्रलंबित विषय मार्गी लागण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. आवश्यकता असल्यास उभय संस्थांमध्ये सामंजस्य करार करून प्रलंबित विषय पुर्णत्वास न्यावेत, असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

बैठकीत ‘या’ महत्वाच्या प्रकल्पांवर करण्यात आली चर्चा
· शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रमुख रस्त्यांसाठी एमआयडीसीकडील आवश्यक जागा उपलब्ध करून देणे.
· शहरातील काही भागात महापालिकेच्या वतीने रहिवाशांना पुरेसा पाणीपुरवठा मिळावा यासाठी एमआयडीसीकडून पाणी घेतले जाते, त्यात सुसूत्रता आणणे.
· पर्यावरणपूरक औद्योगिक क्षेत्र निर्माण करण्यासाठी सुधारित कचरा व्यवस्थापन उपायांची अंमलबजावणी करणे.
· नागरी सुरक्षिततेसाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी एमआयडीसीतील रस्त्यांवर सीसीटीव्ही यंत्रणा बसविणे.
· मलशुद्धीकरण प्रकल्पांसाठी एमआयडीसीकडील जागा उपलब्ध करून देणे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"