फक्त मुद्द्याचं!

18th June 2025
पिंपरी-चिंचवड

पर्युषण सुरू आहे.. जप, तप, ध्यान करा

पर्युषण सुरू आहे.. जप, तप, ध्यान करा

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : जैन धर्मियांच्या पर्युषणामध्ये तप, जप ,दान आणि धार्मिक भावना यांना महत्व आहे, आता पर्युषण पर्व सुरु झाले आहे, असे मत जैन साध्वी मंगलप्रभाजी महाराज यांनी कासारवाडीत व्यक्त केले.

कासारवाडी जैन श्रावक संघाच्या आनंद दरबार सभागृहात पर्युषण महापर्वाचा शुभारंभ आध्यात्मिक धार्मिक आणि उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. आनंद दरबार पगारिया सभागृहामध्ये अष्ठदिवशीय पर्युषण महापर्वाचा पहिला दिवस शुभारंभ झाला. धार्मिक, अध्यात्मिक, मंगलमय आणि उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. दिव्यांशीश्रीजी यांनी अंतगड सूत्राचे पहिले दोन अध्याय अर्थासहित पठण केले. त्यानंतर उपप्रवर्तिनी मंगल प्रभाजी महाराज, डॉ मधुस्मिताजी महाराज, हर्षिताजी महाराज, दिव्यांशीश्रीजी महाराज, आदी उपस्थित होते. महासतीजी डॉ मधुस्मिताजी यांचे” पर्युषण महापर्व आणि अहिंसा” या विषयावर उद्बोधक प्रवचन झाले.

यावेळी कासारवाडी ,दापोडी सांगवी, पिंपळे गुरव या परिसरातील भाविक, श्रावक, श्राविका मोठ्या संख्येने सभागृहात उपस्थित होते महान तपस्विनी श्रीमती गीता जैन यांच्या ४४ व्या उपवासाचे प्रत्याखान झाले. बहुसंख्य भाविक तपाच्या माध्यमातून हे पर्व साजरे करत आहेत. दिलीप भन्साळी यांनी सूत्रसंचालन केले , यावेळी पाठशाळेच्या विद्यार्थ्यांची आणि सुशील बहु मंडळ ची पर्युषणावरील नाटिका सादर करण्यात आली.

तेजस्वी पगारिया, अपेक्षा मुथा , स्वाती पगारिया यांनी संयोजन केले .श्रावक संघाचे अध्यक्ष श्रेयस पगारिया, महामंत्री पंकज कांकरिया, कोषाध्यक्ष संदीप कर्नावट, मयुर पगारिया, प्रशांत बाफना, पंकज कटारिया, स्नेहल भंडारी आणि इतर पदाधिकारी हे कार्यक्रमाच्या व्यवस्थेसाठी परिश्रम घेत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"