फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
पिंपरी-चिंचवड

प्रखर हिंदुत्ववादी आणि विधिमंडळ गाजवणारा नेता!

प्रखर हिंदुत्ववादी आणि विधिमंडळ गाजवणारा नेता!
  • आमदार उमा खापरे, विधान परिषद सदस्य

पिंपरी चिंचवड शहरातील राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आपल्या कामातून ठसा उमटवणारे नेतृत्व म्हणजेच भोसरीचे लोकप्रिय आमदार महेश दादा लांडगे होत. प्रखर हिंदुत्ववादी आणि जनतेच्या प्रश्नांसाठी आक्रमक होणारा, सामान्यांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरणारे व्यक्तिमत्व आहे, असे मत विधान परिषदेचे आमदार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माजी विरोधी पक्ष नेत्या उमा खापरे यांनी व्यक्त केले.

गेल्या अनेक वर्षांपासून मी महेश दादांना पाहिलं आहे त्यांचा राजकीय पट सामाजिक पट हा आपला सर्वांसमोर आहे. सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या महेश दादांनी राजकारणामध्ये आपल्या कर्तुत्वाने स्थान निर्माण केले आहे हे कौतुकास्पद आहे. ते उत्तम राजकारणी तर आहेत त्याचबरोबर उत्तम खेळाडू पैलवानही आहेत. महेश दादा हे जरी पैलवान असले तरी, त्यांचा स्वभाव मृदू आणि कोमल आहे. शरीर बलाढ्य वाटत असलं तरी, ते अंतर मनातून मायाळू आहेत. महेश दादा स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक आणि क्रीडा विषयक मोठ्या प्रमाणावर काम केले आहे पिंपरी चिंचवड मधील कुस्ती कबड्डी इतर खेळांना व्यासपीठ मिळवून देणे त्याचबरोबर त्या खेळांसाठी खेळाडूंसाठी योगदान देण्याचे काम केलेल आहे कारण ते एक कुस्तीगीर आणि खेळाडू आहेत.

क्रीडा क्षेत्रात काम केले असल्याने त्यांचा स्वभाव खिलाडू वृत्तीचा आहे अत्यंत मिश्किल आहे. त्यांच्या बोलण्यातून तो मिश्किलपणा जाणवत असतो. त्यांचा एक स्वभाव आवडणारा आहे तो म्हणजे, कुणी काहीही म्हटलं कितीही टीका केले तरी ते आपल्या कार्यप्रणाली पासून मागे हटत नाहीत. हेच त्यांच्या यशाचे, राजकीय यशस्वीतेचे गमक आहे असे मला वाटते.

उमा खापरे

कार्यकर्ता जोडणारा नेता
महेश दादांच्या कार्याविषयी आणि व्यक्तिमत्व विषयी उमा खापरे म्हणाल्या, ‘ राजकारण असो की समाजकारण असो त्यामध्ये कार्यकर्त्यांशी नेत्याचा संवाद कसा आहे यास महत्त्व असते. भोसरी विधानसभा मतदारसंघांमध्ये त्यांनी कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण केलेली आहे जनतेची कामे कशी करायची याची लकब आणि कौशल्य त्यांच्याकडे आहे. भोसरीच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी गेल्या दहा वर्षांपासून आमदार असताना आणि त्यापूर्वीही नगरसेवक असताना मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले आहेत. राज्य शासनाच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणावर प्रकल्प भोसरी विधानसभेत आणलेले आहेत. तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने अनेक प्रकल्प राबवून भोसरी परिसराला विकासाच्या प्रक्रियेत आणले आहे.

नागरी समस्या सोडवण्याची जबाबदारी केवळ महापालिकेची असते असे नाही ती लोकप्रतिनिधीची आहे हे जाणून महेश दादांनी भोसरी विधानसभा मतदारसंघांमध्ये परिवर्तन हेल्पलाइन सुरू केलेले आहे या परिवर्तन हेल्पलाइनच्या माध्यमातून नागरिकांचे मूलभूत रस्ते वीज पाणी या मूलभूत प्रश्न सोडवले जातात. प्रश्नांचा पाठपुरावा केला जातो.”

विधिमंडळातही अव्वल
विधिमंडळातील महेश दादांच्या कामगिरीविषयी उमा खापरे म्हणाल्या, ‘पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील सभागृह महेश दादांनी गाजवलेला आपण पाहिलेला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील विधिमंडळाचे अधिवेशन असो किंवा विधानसभेतील चर्चा असो त्यामध्ये महेश दादांनी आक्रमकपणे आपल्या भूमिका मांडलेले आहेत. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मांडण्यासाठी त्यांनी आक्रमक होण्यातही पुढे मागे पाहिलेले नाही. भोसरीचा विकास हाच एकमेव ध्यास त्यांचा असल्याचे दिसून येते त्या दृष्टीने ते नेहमी कार्यरत असतात.’

हिंदुत्वाचा विचार आणि प्रखर नेतृत्व!
महेश दादांकडे पाहिल्यानंतर किंवा त्यांची वेशभूषा पाहिल्यानंतर अनेकदा हिंदुत्वाचा प्रखर निखारा, असे वर्णन करता येईल असे सांगून उमाताई खापरे म्हणाल्या, देव देश आणि धर्म यासाठी जे व्यक्तिमत्व योगदान देते ते लोकप्रिय असते. महेश दादा लांडगे हेही असेच व्यक्तिमत्व आहे. अनेकदा त्यांचा पेहराव वेशभूषा पाहून हिंदुत्वाचा हा प्रखर निखारा आहे असे वाटते. हिंदुत्व संदर्भातील विविध आंदोलने असतील किंवा विधिमंडळात झालेली चर्चा असेल, त्यामध्ये हिंदुत्व आणि छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्या विरोधात जो येईल त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. महेश दादांच्या प्रयत्नातून भोसरी विधानसभा मतदारसंघांमध्ये शंभूराजे यांचे मोठे शिल्प उभे राहत आहे त्याचबरोब इंद्रायणी थडी जत्रेच्या माध्यमातून बचत गटांना प्रोत्साहन देणे तसेच सांस्कृतिक चळवळ वाढीसाठी प्रयत्न केले आहेत. राम मंदिरासाठी निधी संकलन असेल किंवा शिवरात्रीच्या निमित्ताने कीर्तन महोत्सवाच्या माध्यमातून वारकरी संप्रदाय आणि हिंदू मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत भरघोस मदत केली आहे. त्यामुळे प्रखर हिंदुत्ववादी अशी ओळख आता महेश दादांची सर्वत्र होऊ लागले आहे. पिंपरी चिंचवडच्या विकासामध्ये तसेच राज्याच्या विकासामध्ये ही महेश दादांचे योगदान आहे त्या दृष्टीने ते विषय मांडत असतात. असे उत्तम नेतृत्व पिंपरी चिंचवड शहराला मिळाले त्यामुळे शहराच्या विकासात निश्चितच भर पडेल असे मला वाटते. ”

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"