फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
पर्यावरण पिंपरी-चिंचवड

शहरातून २५० मेट्रिक टन निर्माल्य संकलन

शहरातून २५० मेट्रिक टन निर्माल्य संकलन

फक्त मु्द्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत शहराच्या विविध विसर्जन घाटांवर यंदा सुमारे २५० मेट्रिक टन निर्माल्य संकलित करण्यात आले.

यंदाच्या गणेशोत्सवात पिंपरी-चिंचवड पालिकेच्यावतीने विविध विसर्जन घाटांवर तसेच मूर्ती संकलन केंद्रांवर सुमारे २५० मेट्रीक टन निर्माल्य संकलित करण्यात आले, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी दिली.

यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाने केले होते. त्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. निर्माल्य कुंडामध्येच टाकण्यास प्राधान्य दिल्याचे आढळून आले. सात ते १८ सप्टेंबरच्या कालावधीत पालिकेच्या क्षेत्रीय स्तरावर निर्माल्य संकलनासाठी कुंडांची व्यवस्था करण्यात आली होती. त्या अनुषंगाने आरोग्य कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली होती.

पालिकेच्या अ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत २४.४५ मेट्रीक टन, ब क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत ५४.६९ मेट्रीक टन, क क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत ३१.३९ मेट्रीक टन, ड क्षेत्रीय कार्यालय हद्दीत ३१.७० मेट्रीक टन, इ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत ३४.११ मेट्रीक टन, फ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत २४.५० मेट्रीक टन, ग क्षेत्रीय कार्यालय हद्दीत ३२.१६ मेट्रीक टन तर ह क्षेत्रीय कार्यालय हद्दीत १६.४८ मेट्रीक टन असे एकूण २४९.५० मेट्रीक टन निर्माल्य संकलित करण्यात आले, असे खोराटे यांनी सांगितले.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"