फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
पिंपरी-चिंचवड

नऊ वाजेपर्यंत ६ टक्के मतदान

नऊ वाजेपर्यंत ६ टक्के मतदान

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : सकाळी सात वाजता सुरू झालेल्या मतदानाला आता हळू हळू केंद्रांवर गर्दी वाढत आहे. शाळा, कॉलेज येथील मतदान केंद्रांबरोबरच यंदा पिंपरी-चिंचवडमधील सोसायट्यांमध्ये उभारलेल्या मतदान केंद्रांवरही नागरिक मतदानाचा हक्क बजावण्यासाठी येत आहेत. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीनही मतदार संघांमध्ये सरासरी साधारण सहा टक्के मतदान सकाळच्या पहिल्या टप्प्यात झाले आहे.

सात वाजता मतदान सुरू झाल्यानंतर दोन तासात म्हणजे नऊ वाजेपर्यंत सहा टक्के मतदान नोंदविण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने हाऊसिंग सोसायटी फेडरेशन आणि गृहनिर्माण संघटनांच्या सहकार्याने २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये १०० टक्के मतदानाचे उद्दिष्ट ठेवले आहे. पिंपरी, भोसरी आणि चिंचवड या मतदारसंघांतील २५ हाऊसिंग सोसायट्यांमध्ये मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. यापैकी १२ केंद्रे चिंचवडमध्ये, ६ पिंपरीमध्ये आणि ७ भोसरीमध्ये आहेत. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी पीसीएमसीने जनजागृती मोहिम सुरू केली आहे आणि ‘आपले मतदान केंद्र जाणून घ्या (Know Your Polling Station)’ ही सेवा उपलब्ध करून दिली आहे. या सेवेमुळे नागरिकांना हेल्पलाइन क्रमांक (८८८८००६६६६) वरून त्यांचे मतदान केंद्र शोधता येईल.

महेश लांडगे यांनी मतदानाचा हक्क बजावला

पिंपरीत ४ टक्के
२०६ पिंपरी विधानसभा मतदारसंघात सकाळी ९.०० वाजेपर्यन्त ४.०४ टक्के मतदान झाले आहे. दुपारी बारा वाजल्यानंतर उन्हाची वेळ असल्यामुळे कदाचित मतदानाचा वेग मंदावेल पण पुन्हा शेवटच्या दोन तासाच मतदानाचा वेग वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

भोसरीत ६.२१ टक्के
भोसरी विधानसभा मतदार संघात मतदारांनी सकाळी सात पासूनच मतदानासाठी बाहेर पडण्यास प्रारंभ केला आहे.

चिंचवडमध्ये ६.८० टक्के
२०५-चिंचवड विधानसभा मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.८० टक्के इतकं अंदाजित मतदान आहे.

जुन्नरमध्ये ५.२९ टक्के मतदान झाले आहे.

खेड-आळंदीमध्ये ४.७१ टक्के मतदान झाले आहे.

आंबेगावमध्ये ५.७९ टक्के, शिरूरमध्ये ४.२७ टक्के, बारामतीमध्ये ६.२० टक्के मतदान झाले आहे.


मतदार यादीतील नावानुसार या सोसायट्यांमध्ये मतदानाची सोय आहे

चिंचवड विधानसभा मतदारसंघ
स्वीस काउंटी (थेरगाव), आशियाना मिडोस, सोनिगरा विहार (काळेवाडी), राजवीर पॅलेस – फेज १ (पिंळे सौदागर), सिद्धिविनायदक जिंजर (पिंपळे सौदागर), निसर्ग आनंद (पिंपळे निलख), सेलेस्टियल सिटी (रावेत), फाइव्ह गार्डनर (रहाटणी), विंडवर्ड (कस्पटे वस्ती, वाकड).

पिंपरी विधानसभा मतदारसंघ
त्रिवेणी (म्हाडा कॉलनी, मोरवाडी), रीवरडेल (म्हाडा कॉलनी, मोरवाडी), मंत्री इटरनिटी (कासारवाडी)

भोसरी विधानसभा मतदारसंघ
चिखली घरकुल प्रकल्प – मधूर मिलन सोसायटी (३ बूथ), केंद्रीय विहार (भोसरी, प्राधिकरण – ३ बूथ),वयाज सोसायटी (मोशी, बोऱ्हाडेवाडी)

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"