फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
पिंपरी-चिंचवड

नो पार्किंग मध्ये वाहन पार्क केल्यास जीएसटी सह दंड वसूल केला जाणार!

नो पार्किंग मध्ये वाहन पार्क केल्यास जीएसटी सह दंड वसूल केला जाणार!

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिसांनी टोईंग कारवाईला पुन्हा सुरुवात केली आहे. नो पार्किंग झोनमध्ये वाहने पार्क करणे वाहन चालकांना चांगलेच महागात पडणार आहे. नो पार्किंग मध्ये वाहन पार्क केल्यास जीएसटी सह दंड वसूल केला जाणार आहे.

शहरातील मध्यवर्ती व वर्दळीच्या मार्गांवर ही कारवाई केली जात आहे. त्यासाठी स्वतंत्र मनुष्यबळ उपलब्ध करून दिले आहे. अनेकजण अस्ताव्यस्त, बेकायदेशीरपणे दिसेल त्या ठिकाणी वाहने पार्क करतात. त्यामुळे दिवसेंदिवस वाहतूक कोंडीत भर पडत आहे. बेशिस्त वाहन चालकांवर कारवाईसाठी वाहतूक पोलीस आता टोईंग वाहनांचा आधार घेणार आहेत.

नो पार्किंग मध्ये पार्क केलेली वाहने जवळच्या वाहतूक शाखेत जमा केली जातील. तिथून नागरिकांना आपली वाहने सोडवून घेता येतील. शहरात एकूण २५ वाहनांद्वारे कारवाई केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात आठ वाहने कार्यान्वित झाली आहेत.

दुचाकी वाहनांसाठी ५०० रुपये दंड, २०० रुपये टोईंग चार्ज, ३६ रुपये जीएसटी असा ७३६ रुपये दंड आकारला जात आहे. तर चारचाकी वाहनांसाठी ५०० रुपये दंड ४०० रुपये टोईंग चार्ज आणि ७२ रुपये जीएसटी असा ९७२ रुपये दंड आकारला जात आहे. टोईंग केलेल्या वाहनावर पूर्वीचे चलन आहे का, याची वाहतूक पोलीस तपासणी करतील. प्रलंबित चलनांपैकी एक आणि आताच्या कारवाईचे एक चलन किमान भरणे बंधनकारक असणार आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"